Krishna Janmashtami 2023 Shubh Muhurta: श्रावण मासातील तिसरा महत्त्वाचा सण म्हणजेच गोकुळाष्टमी यंदा ६ सप्टेंबर २०२३ ला साजरा होणार आहे. ६ सप्टेंबरला दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी अष्टमी तिथीचा प्रारंभ होणार आहे तर ७ सप्टेंबर म्हणजेच दहीहंडीच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून १४ मिनिटांनी अष्टमी तिथी समाप्त होईल. ज्योतिष शास्त्रानुसार यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीला ग्रह व नक्षत्रांचा एक विशेष योगायोग जुळून आलेला आहे. तब्बल ३० वर्षांनी या दिवशी चंद्र रोहिणी नक्षत्र व वृषभ राशीत असणार आहे. याशिवाय रवी व सर्वार्थ सिद्धी राजयोग सुद्धा यादिवशी जुळून येत आहे. गोकुळाष्टमी विशेष या आठवड्यात नेमक्या कोणत्या राशीचे नशीब उजळणार आहे? कोणाला श्रीकृष्ण श्रीमंतीसह गोड बातमी देणार आहेत हे पाहण्यासाठी या आठवड्याचे राशिभविष्य जाणून घेऊया..
१० सप्टेंबर पर्यंतचे मेष ते मीन अशा १२ राशींचे भविष्य
मेष रास (Aries Weekly Rashi Bhavishya)
बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टींची तुम्ही वाट पाहात आहात ती गोष्ट सध्या प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. व्यावसायिकदृष्टय़ा भरभराट होईल. नोकरदार वर्गाचे कामात लक्ष लागेल. आर्थिक टंचाई जाणवणार नाही. विवाह ठरतील. मानसिक समाधान लाभेल. अध्यात्माची गोडी वाढेल. आरोग्य ठणठणीत राहील.
वृषभ रास (Taurus Weekly Rashi Bhavishya)
व्यवसायात जुने काही व्यवहार पूर्ण करताना संयम ठेवा. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्यायला हवे. आर्थिक गुंतवणूक टाळा. सोशल मीडियाचा वापर करताना भान ठेवा. कौटुंबिक गोडी व जोडीदाराची साथ तुम्हाला या आठवड्यात आनंदी ठेवू शकते.
मिथुन रास (Gemini Weekly Rashi Bhavishya)
प्रेमाच्या बाबत तुम्हाला हा आठवडा अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आपल्याला नवनवीन आर्थिक मिळकतीचे स्रोत प्राप्त होतील. मिळकतीसह खर्च सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला हवे तसे परिणाम देणारा हा कालावधी ठरू शकतो. तुम्हाला प्रवासाच्या माध्यमातून नवीन संपर्क जोडता येऊ शकतात ज्यांचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होणार असल्याची चिन्हे आहेत. पोटाची काळजी घ्या.
कर्क रास (Cancer Weekly Rashi Bhavishya)
कर्क राशीला या आठवड्यात नशिबाची उत्तम साथ लाभू शकते. नोकरदार मंडळींना आपल्या वरिष्ठांकडून कौतुक झाल्याने हा आठवडा अगदी आनंदात जाऊ शकतो. तुम्हाला शेअर्स किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातुन मोठा धनलाभ होऊ शकतो. सोनेखरेदी फायद्याची ठरू शकते. आठवड्याच्या शेवटाकडे काही प्रमाणात शीण जाणवू शकतो. सुविधांसाठी खर्च करावा लागेल पण याकडे गुंतवणूक म्हणून पाहिल्यास मानसिक भार कमी होऊ शकतो.
सिंह रास (Leo Weekly Rashi Bhavishya)
आठवड्याच्या सुरुवातीला सिंह राशीला प्रचंड धावपळ करावी लागणार आहे. यामध्ये तुमची मानसिक व शारीरिक शक्ती खर्ची होऊ शकते. मात्र तुम्हाला या धावपळीचे फळ अत्यंत मोठ्या आर्थिक लाभासह मिळू शकणार आहे. या आठवड्यात अनपेक्षित मिळकत व तितकेच न ठरवलेले खर्च तुमच्या वाट्याला येणार आहेत. मनाला जपा. भावनांची गुंतागुंत वाढू शकते.
कन्या रास (Virgo Weekly Rashi Bhavishya)
व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. नोकरदार वर्गाला शांत डोक्याने काम करावे लागेल. आर्थिक बाबतीत अचानक धनलाभ होऊ शकतो. समाजसेवा करावीशी वाटेल, पण ही समाजसेवा करताना सामंजस्याने वागा. भावंडांशी मनमोकळेपणाने गप्पा माराल.
तूळ रास (Libra Weekly Rashi Bhavishya)
या आठवड्यात स्वतःचा राग व मानसिक संतुलन यांचे द्वंद्व होण्याची शक्यता आहे. तुम्हाला योगसाधनेवर अधिकाधिक भर द्यायला हवा. काही दिवस तुमच्या वाणीने शब्द उच्चारण्याच्या ऐवजी आधी मनातल्या मनात बोलून पाहा अन्यथा तुम्ही अनेकांची मने दुखावू शकता. तुमचे आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते. यामुळे हा आठवडा संयमाने वागणेच हुशारीचे ठरू शकते.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Rashi Bhavishya)
षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे चंद्राचे भ्रमण तुमच्यासाठी तारेवरची कसरत असणार आहे. ही कसरत यशस्वी व्हावी असे वाटत असेल तर घाई करू नका. आर्थिक काटकसर करावी लागेल. घरगुती गोष्टी चारचौघात बोलणे टाळा. जोडीदाराची साथ मिळेल.
धनु रास ( Sagittarius Weekly Rashi Bhavishya)
व्यवसायात धावपळ करावीच लागणार आहे. नोकरदार वर्गाने काम करताना वरिष्ठांविषयी चर्चा करू नये. वायफळ खर्च टाळा. नातेवाईकांशी संबंध सुधारणारा असा हा आठवडा आहे. आठवड्याच्या शेवटाकडे तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवल्यास मोठा धनलाभ होऊ शकतो.
मकर रास (Capricorn Weekly Rashi Bhavishya)
आजपर्यंत व्यवसायासाठी केलेली धावपळ ही यशस्वी ठरणार आहे. नोकरदार वर्गाला काम करताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागेल, पण ही तांत्रिक अडचण क्षणार्धाची असेल. आई वडिलांचे आरोग्य सांभाळावे लागले. गुंतवणुकीवर अधिकाधिक भर द्या. भविष्यात खर्च वाढण्याची चिन्हे आहेत तेव्हा तुम्हाला आताची बचत कामी येऊ शकते.
कुंभ रास (Aquarius Weekly Rashi Bhavishya)
आठवड्यातील सर्व दिवस चांगले असल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. करदार वर्गाची कामातील जबाबदारी वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक समस्या जाणवणार नाही. राजकीय क्षेत्रात जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कामे अगदी वेळेत पूर्ण होतील. व्यवसायात बाकी राहिलेले व्यवहार मार्गी लागतील.
हे ही वाचा<< दहीहंडी, गणेशोत्सवचा महिना, १२ राशींपैकी कोणासाठी ठरेल गोड? ३० सप्टेंबरपर्यंतचं तुमच्या राशीचे भविष्य वाचा
मीन रास (Pisces Weekly Rashi Bhavishya)
या आठवड्यात सगळे दिवस चांगले असतील. चांगल्या पर्वाची नांदी होईल. सध्या सर्व काही सुरळीत चालू होईल. अडचणीचा कालावधी कमी झाल्यामुळे दडपण दूर होईल. अपेक्षा नसतानासुद्धा काही प्रस्ताव तुमच्यासमोर येतील, ते स्वीकारल्यास फायदा होऊ शकतो. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत परिस्थिती समाधानाची असेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)