Shani Gochar 2024 Zodiac Signs to Benefit: शनीदेव हे ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता मानली जातात. ना ते कोणाचे मित्र ना ते कोणाचे शत्रू मात्र प्रत्येक राशीच्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुरूप फळ देण्याचे काम शनीचे असते. २०२३ हे शनीचे वर्ष म्हणून ओळखले गेले होते. जानेवारीच्या सुरुवातीलाच शनीने आपल्या मूळ त्रिकोण राशीत प्रवेश घेतला होता. ३० वर्षांनी कुंभ राशीत विराजमान झालेले शनी आता या गोचराची वर्षपूर्ती करत आहेत. शनीच्या प्रभावाचा एक टप्पा यामुळे पूर्ण होणार आहे तर आता पुढच्या टप्प्यात त्याचा प्रभाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. १७ जानेवारी २०२४ ला वर्षपूर्तीनंतर शनीच्या प्रभावाचा द्वितीय टप्पा आरंभणार आहे. वर म्हटल्याप्रमाणे शनीला शुभ अशुभ परिणाम व्यक्तीच्या कर्मानुरूप व त्या राशीच्या गोचर कुंडलीतील स्थानावरून देत असतो. येत्या कालावधीत खालील तीन राशींच्या कक्षेत शनी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. परिणामी या राशींना सर्वतोपरी बदल अनुभवता येणार आहेत. शनीच्या कृपेने धन- आरोग्य व प्रगती अनुभवू शकतील अशा या तीन राशी कोणत्या पाहूया..
शनी गोचराची वर्षपूर्ती; २०२४ मध्ये ‘या’ राशींना धनलाभाचे प्रबळ योग
कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)
शनी महाराजांचे कुंभ राशीतील स्थान कर्क राशीच्या करिअर व कामाच्या ठिकाणी अत्यंत प्रभावशाली ठरू शकते. या मंडळींना नव्या नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात. आपल्यावरील शनीच्या अडीच वर्षांच्या ढैया प्रभावाची समाप्ती होत आहे त्यामुळे मानसिक ताण तणाव दूर होऊ शकतो. अत्यंत समजूतदारीने गोड बोलून काम करून घ्यावे लागू शकते पण तुम्ही स्वतःच्या हिताला प्राधान्य द्यायला हवे. विवाहित महिलांसाठी तर हा कालावधी खूपच लाभदायक सिद्ध होऊ शकतो. सासरच्या घरी अचानक मोठ्या धनलाभाचे संकेत आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनशैलीत काही महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
आपल्याला शनीचा प्रभाव वैवाहिक जीवनात जाणवून येऊ शकतो. तुम्हाला अचानकच जोडीदाराचा इतका भक्कम पाठिंबा लाभू शकतो की आजवर फक्त विचार केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणू शकता. फेब्रुवारी- मार्च मध्ये कुटुंबासह प्रवासाचे योग आहेत. परीक्षांमध्ये यश हाती येऊ शकते. विद्यार्थी वर्गासाठी हा कालावधी विशेष लाभदायक सिद्ध होऊ शकतो. प्रेमाच्या नात्यातील गोडवा वाढू शकतो. लग्नाचे योग आहेत. खर्च सांभाळून करा, गुंतवणुकीवर भर द्या. या कालावधीत पोटाचे आरोग्य नीट जपा.
हे ही वाचा<< १२ जानेवारी पंचांग: अमावस्या संपताच मेष ते मीन राशींचे नशीब कसे बदलणार? पौष मासाच्या पहिल्या दिवसाचे भविष्य
धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)
शनी महाराजांच्या गोचरासह आपल्यावरील शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपणार आहे. तुम्ही तुमच्या मनाला आवडेल तसे वागण्यासाठी काही प्रमाणात मुक्त व्हाल. परदेश प्रवासाची संधी आपल्या भाग्यात आहे. व्यवसायात जोडीदाराची साथ लाभू शकते. ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या बाजूने असतील तसेच सहकाऱ्यांची सुद्धा साथ लाभेल त्यामुळे येत्या काही महिन्यातच पदोन्नती व पगारवाढीची चिन्हे आहेत. एखादी जोखीम उचलावी लागू शकते मात्र तुमचे निर्णय योग्य पद्धतीने घेतल्यास मिळणारा नफा सुद्धा द्विगुणित असेल. संततीप्राप्तीसाठी प्रयत्न करत असल्यास लवकरच गोड बातमी मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)