Ganesh Chaturthi 2023 Shubh Yog: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर हे जेव्हा सण-उत्सवाच्या निमित्ताने होत असते तेव्हा त्यातून अनेक शुभ राजयोग तयार होत असतात. यंदाच्या गणेशउत्सवाला तर तब्बल ३०० वर्षांनी पहिल्यांदाच तीन मोठे व महत्त्वाचे राजयोग तयार होत आहे. यंदा हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरला साजरी होणार आहे. ६४ कलांचे अधिपती, गणराज या दिवशी आपल्या भक्तांच्या घरी विराजमान होणार आहेत. याच दिवशी ग्रहमानानुसार शुक्ल योग, ब्रह्म योग, शुभ योग तयार होत आहे. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीच सूर्याचे महागोचर होणार असल्याने या तीन ही राजयोगांमध्ये सूर्यदेव प्रभावी असणार आहेत. याशिवाय मागील महिन्यातच शनीची शक्ती जागृत झाल्याने १२ राशींना विविध पद्धतीने लाभ होण्याची चिन्हे आहेत. तीन अशा राशी आहेत ज्यांना गणपती बाप्पाच्या आगमनापासून धनलाभासह मोदकासारख्या गोड बातम्या मिळण्याची चिन्हे आहेत. या नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..
गणेश चतुर्थीपासून ‘या’ राशींना अपार धनलाभाचे योग
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
गणेशचतुर्थीला तीन विशेष राजयोग बनल्याने मेष राशीला मेहनतीचे शुभ फळ प्राप्त होण्याची चिन्हे आहते. संतती प्राप्तीचे योग आहेत. शिवाय तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. तुमच्या अडकून पडलेल्या कामाला वेग येणार आहे. या काळात तुमच्या मान- सन्मानात वाढ होण्याची चिन्हे आहेत. करिअरची दिशा बदलणारा एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी उत्तम काळ आहे. गणराज तुम्हाला बुद्धीचे वरदान देतील ज्यामुळे तुम्ही प्रलंबित कामांना गती देऊ शकता व कामं मार्गी लागल्याने पद-प्रतिष्ठा व पैसे सर्व काही प्राप्त होण्याची संधी आहे.
मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)
ज्योतिषशास्त्रानुसार, गणेश चतुर्थीला शुभ योग बनल्याने आपल्या राशीला लाभ होण्याची सुरुवात होऊ शकते. आपल्याला धनप्राप्तीचा भाग्योदय होण्याची चिन्हे आहेत. म्हणजेच अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्ही विद्यार्थी दशेत असाल आणि एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला यावेळेस यश प्राप्तीची पूर्ण शक्यता आहे. आर्थिक मिळकत वाढू शकते. विवाहित मंडळींना जोडीदाराशी नव्याने जोडले जाण्याची संधी मिळू शकते. तुमचे नातेवाईकांशी सुद्धा नातेसंबंध सुधारतील.
हे ही वाचा<< शनीचा शश राजयोग बनल्याने ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ होईल सुरु; लक्ष्मी घरी आणेल सोन्या-सुखाचा हंडा?
मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)
गणेश चतुर्थीला तीन विशेष राजयोग बनल्याने मकर राशीच्या मंडळींना व्यवसायात फायदा होऊ शकतो. तीन राजयोग आपल्या कर्म स्थानी अधिक सक्रिय असल्याने तुम्हाला कामातूनच प्रचंड धनलाभ व फायदा होण्याची चिन्हे आहेत. गणेशोत्सवानंतर लगेचच एखादी प्रवासाची संधी मिळू शकते. तुम्हाला गुंतवणुकीच्या उत्तम संधी मिळू शकतात ज्यातून तुम्ही विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास नियमित कमाईच्या दुप्पटीने लाभ होऊ शकतो. शेअर बाजारात फायद्याची चिन्हे आहेत.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)