30th December Horoscope In Marathi: २०२३ मधील शेवटची संकष्टी चतुर्थी शनिवारी जुळून आली आहे. अशातच ग्रहांची स्थिती पाहता मेष ते मीन पैकी तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा असेल हे पाहूया..

मेष:- भविष्याची फार चिंता करू नका. जवळच्या नातेवाईकाचा सल्ला मोलाचा ठरेल. काही प्रश्न लवकरच निकालात निघतील. तुमच्या समस्यांचे निराकरण होईल. मानसिक दृष्ट्‍या सक्षम बनाल.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
8 December Aries To Pisces Horoscope Today
८ डिसेंबर पंचांग: कोणाला होईल अचानक धनलाभ ते कोणाचा वाढेल ताण; जन्मराशीनुसार आजचा रविवार १२ राशींसाठी कसा असणार?
7 December astrological predictions for zodiac signs
७ डिसेंबर पंचांग: धनिष्ठा नक्षत्रात १२ राशींवर होणार सुखाचा वर्षाव; पद, पैसा, प्रतिष्ठेत होईल वाढ, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय खास?
Kark Rashifal 2025
Kark Rashifal 2025: कर्क राशीसाठी कसे असेल नववर्ष २०२५? कोणत्या ग्रहाचे गोचर ठरणार लाभदायी, कोणाची होईल कृपा?
Shukra Nakshatra Gochar 2024
११ डिसेंबरपासून ‘या’ राशीच्या लोकांची होईल चांदी चांदी! धनाचा दाता शुक्र करणार श्रवण नक्षत्रात प्रवेश, यशाबरोबर कमावणार पैसाच पैसा

वृषभ:- भावंडांसोबत वेळ मजेत घालवाल. मनात उगाच नसत्या चिंता आणू नका. वेळेचा सदुपयोग करावा. देवाणघेवाण करताना सावध राहावे. लहान भावाला दूर गावी जावे लागेल.

मिथुन:- आज सुखद अनुभव येतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल. भावंडांसह नवीन काम सुरू करू शकता. चर्चा सकारात्मक असेल.

कर्क:- वायफळ बडबड करणार्‍यांपासून दूर राहावे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. घरातील कामासाठी थोडा वेळ काढावा लागेल. दिवस धावपळीत जाईल. एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते.

सिंह:- आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. प्रवासात वेळेचे भान राखावे. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

कन्या:- आज दिवस संमिश्र जाईल. अनपेक्षित लाभ मिळू शकतात. मात्र फार हुरळून जाऊ नका. द्विधा मनस्थितीतून बाहेर यावे. अति विचार करणे टाळावे.

तूळ:- शत्रूलाही आज मित्र बनवू शकाल. इतरांवर तुमची चांगली छाप पडेल. कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पहायला मिळतील. पत्नीला खुश करता येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

वृश्चिक:- आज मनाची संवेदनशीलता दाखवाल. शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अभ्यासातून मन विचलीत होऊ देऊ नका.

धनू:- आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. लॉटरी लागू शकते. प्रेमी युगुलांना दिवस सुखद जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल.

मकर:- आपली क्षमता ओळखून काम करावे. आळस झटकावा लागेल. अति स्पष्ट बोलणे टाळावे. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. कामाचा उरक वाढवावा.

कुंभ:- जवळचा प्रवास चांगला होईल. तुमच्या हातातील काम पूर्ण होईल. अधिक धीटपणे काम कराल. पराक्रमाला चांगला वाव आहे. नातेसंबंधात सुधारणा होईल.

हे ही वाचा<< ४ फेब्रुवारीपर्यंत सोन्याचे दिवस जगतील ‘या’ शनी- सूर्य प्रिय राशीचे लोक; लक्ष्मीच्या ‘या’ रूपांमध्ये घरी येईल मांगल्य

मीन:- आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ध्यान करावे. व्यायामाला कंटाळा करू नका. आवडते पदार्थ खाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करावी. कौटुंबिक सौख्यात भर पडेल.

_ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader