30th June Mararthi Panchang & Rashi Bhavishya: ३० जून २०२४ ला ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी असणार आहे. रविवारच्या दिवशी दुपारी १२ वाजून २० मिनिटांपर्यंत नवमी तिथी असेल व त्यानंतर दशमी तिथीला प्रारंभ होईल. ३० जूनचा पूर्ण दिवस व रात्र सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. आज सकाळी ७ वाजून ३४ मिनिटांपर्यंत रेवती नक्षत्र जागृत असेल व त्यानंतर आश्विनी नक्षत्र जागृत होणार आहे. आज शनी देवाने कुंभ राशीत वक्र स्थितीत भ्रमण करण्यास सुरुवात केली आहे. आजच्या दिवशी मेष ते मीन राशीचे भाग्य कसे उजळेल हे पाहूया..

३० जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. गायन कलेचे कौतुक होईल. छंद जोपासायला वेळ मिळेल.

Budh Gochar 2024
आजपासून ‘या’ ५ राशींचा सुवर्णकाळ सुरू, हाती येणार अमाप पैसा? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात गडगंज श्रीमंत
1st July 2024 Panchang And Rashi Bhavishya Mesh To Meen Which zodiac signs will be blessed by Lord Shiva Read Daily Marathi horoscope
१ जुलै पंचांग: व्यवसायात भरघोस वाढ ते कौटुंबिक सौख्य; १२ पैकी या राशींवर राहील शंकराची कृपा; वाचा ‘सोमवार’चे तुमचे राशिभविष्य
27th June 2024 Guruvar Rashi Bhavishya Krishna Paksha Shashti Tithi mesh to mean zodiac signs daily marathi horoscope in marathi
२७ जून पंचांग: नोकरी, व्यवसायात मिळेल लाभ, कामानिमित्त घडतील प्रवास; मेष ते मीन राशींचा असा जाईल गुरुवार
29th June Marathi Panchang & Rashi Bhavishya
२९ जून पंचांग: शनी निघाले वक्र चालीत पुढे, बुधाचाही राशी बदल; आज १२ राशींच्या तन – मन – धनाची शक्ती कशी वाढेल?
24th June Panchang & Rashi Bhavishya
२४ जून पंचाग: इंद्रदेव मेष ते मीन राशींपैकी ‘या’ मंडळींच्या कुंडलीत पाडणार सुखाचा पाऊस; धनवृद्धीने सुरु होईल आठवडा
13th June Marathi Panchang Guru Gochar In Rohini Nakshtra Swami To Bless Mesh To Meen Rashi
१३ जून पंचांग: गुरुवारी स्वामी ‘या’ राशींवर धरणार कृपेचं छत्र; मेष ते मीन राशींपैकी कुणाचं पारडं होणार धनसुखाने जड, वाचा
masik rashifal july 2024 very lucky for 5 zodiac signs
जुलै महिना या ५ राशींसाठी ठरेल वरदान! मिळेल सुवर्णसंधी आणि राजवैभव
21st June Panchang & Rashi Bhavishya
वटपौर्णिमा विशेष, २१ जून पंचांग: आज मेष ते मीन पैकी कुणाला लाभणार सौभाग्य; तुमच्या नशिबात कोणत्या रूपात येईल सुख?

वृषभ:-नवीन गोष्टी समर्थपणे पेलाल. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवावी. घर खर्च वाढू शकतो. वैचारिक चंचलता जाणवेल. कामात स्थैर्य ठेवावे.

मिथुन:-आपली हौस भागवाल. गरज पडल्यास थोडे मागे यावे. मनातील निराशा झटकून टाकावी. जोडीदाराला शा‍ब्दिक दिलासा द्यावा लागू शकतो. नियमांचे काटेकोर पालन करावे.

कर्क:-स्वभावाला काहीशी मुरड घालावी लागेल. पोटाची काळजी घ्यावी लागेल. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. अति विचारात गढून जाऊ नका. झोपेची तक्रार कमी होईल.

सिंह:-तरुण लोकांशी मैत्री कराल. जवळच्या लोकांच्या गाठी पडतील. तुमची कला चार चौघांसमोर सादर करता येईल. भागिदारीतून नफा मिळू शकेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

कन्या:-केलेल्या कामातून समाधान मिळेल. चंचलतेला आवर घालावी लागेल. सहकारी वर्ग तुमच्यावर खुश असेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी. पत्नीशी मतभेदाची शक्यता.

तूळ:-बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागेल. कामात अपेक्षित यश मिळेल. समस्येकडे संधी म्हणून पहावे. जुनी गुंतवणूक फळाला येईल. शेअर्सच्या मार्गाने नफा कमवाल.

वृश्चिक:-व्यावसायिक वातावरण पूरक राहील. घरातील कामासाठी वेगळा वेळ काढावा लागेल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. अडचणीतून मार्ग काढण्याची तयारी ठेवावी. जोडीदाराकडून समजुतीची अपेक्षा राहील.

धनू:-सारासार विचार करण्यावर भर द्याल. आशावादी दृष्टीकोन वाढीस लावावा. योग्य तर्क वापरावा लागेल. स्वत:चा मान राखून वागाल. खिलाडु वृत्तीने वागाल.

मकर:-धाडसाला दूर दृष्टीची जोड द्यावी. कौटुंबिक वातावरणातून आनंद मिळेल. घेतलेली जबाबदारी हिंमतीने पार पाडाल. शांत चित्ताने विचार करावा. तुमची चिकाटी कौतुकास पात्र ठरेल.

कुंभ:-व्यावहारिक ज्ञान वापरून कामे पूर्ण कराल. स्मरणशक्तीच्या जोरावर बारकावे लक्षात घ्याल. आपल्या ज्ञानाचा योग्य वेळी वापर कराल. टोचून बोलणे टाळण्याचा प्रयत्न करा. अति तिखट पदार्थ खाणे टाळा.

हे ही वाचा<< शनीच्या नक्षत्रात सोन्याचे दिवस, ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन जुलैच्या पहिल्याच आठवड्यात होणार सुरु; तुम्हाला कशी लाभेल श्रीमंती?

मीन:-वरिष्ठांपुढे नवीन विचार मांडाल. हट्टीपणा कमी करावा लागेल. पित्त विकार बळावू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. काही कामे तुमचा कस पाहतील.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर