30th September Rashi Bhavishya & Panchang : आज ३० सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी संध्याकाळी ७ वाजून ७ मिनिटांपर्यंत राहील.सोमवारी रात्री १ वाजून १८ मिनिटांपर्यंत शुभ योग राहील. तसेच मंगळवारी सकाळपर्यंत म्हणजेच ९ वाजून १६ मिनिटांपर्यंत पूर्वा फाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ पहाटे ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल.आज त्रयोदशी तिथी असणाऱ्यांचे श्राद्ध केले जाईल. विशेष म्हणजे सोमवारी सोम प्रदोष व्रत सुद्धा असणार आहे. त्यामुळे शंकराच्या कृपेने मेष ते मीन राशीसाठी आजचा दिवस काय खास घेऊन आला आहे जाणून घेऊ या…

३० सप्टेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल. जनसंपर्कात भर पडेल. जोडीदाराची साथ मिळेल.

26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार प्रचंड लाभ; वाचा सूर्याच्या हस्त नक्षत्रात प्रवेशाने तुमच्या कुंडलीत काय बदल होणार
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
After Diwali Jupiter will change Nakshatra
देवी लक्ष्मी देणार बक्कळ पैसा! दिवाळीनंतर गुरू करणार नक्षत्र परिवर्तन; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींची होणार भरभराट
18th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१८ सप्टेंबर पंचांग: पंचांगानुसार आज कोणाच्या कुंडलीत होणार उलथापालथ? आरोग्य तर धन-संपत्तीकडे द्यावं लागणार लक्ष; वाचा तुमचे राशीभविष्य
Anant Chaturdashi | a rare Sanyog brings good fortune to four lucky zodiac signs
Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी निर्माण होणार दुर्मिळ संयोग; ‘या’ चार राशींचे नशीब चमकणार, बाप्पाच्या आशीर्वादाने येईल चांगले दिवस
Surya nakshatra parivartan 2024
३० सप्टेंबरपासून पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
Shukra Nakshatra Gochar 2024
Shukra Nakshatra Gochar : शुक्र करणार या नक्षत्रात गोचर, १३ सप्टेंबरपर्यंत ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार धनलाभ
2nd September Panchang & Marathi Rashi Bhavishya
२ सप्टेंबर पंचांग: श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी कोणाचं भाग्य उजळणार? शिवयोग १२ पैकी ‘या’ पाच राशींच्या नशिबात प्रेम, धन, सुख देणार; वाचा तुमचे भविष्य

वृषभ:- मुलांकडून अपेक्षा पूर्ण केल्या जातील. दिनक्रम व्यस्त राहील. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. जुनी कामे पूर्ण करता येतील. प्रवासात काळजी घ्यावी.

मिथुन:- स्वप्नवत वातावरणात रमून जाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल.

कर्क:- उगाच चिडचिड करू नका. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका. मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा. आवडीवर खर्च कराल.

सिंह:- आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक आंदोलन ओळखून वागावे. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका.

कन्या:- मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडीच्या गोष्टी करता येतील. दिवस चांगला जाईल. व्यापरिवर्गाला चांगला लाभ मिळेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल.

तूळ:- जवळची व्यक्ति भेटेल. दिवस कामात व्यस्त राहील. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे. आपले स्वत्व राखून वागाल.

वृश्चिक:- कौटुंबिक समाधान शोधाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.

धनू:- अचानक धनलाभ संभवतो. छानछोकीसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल. दान-धर्म कराल. आर्थिक बाजू सुधारेल.

मकर:- जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. भागीदाराची बाजू विचारात घ्या. अनावश्यक खर्च संभवतो.

कुंभ:- जोडीदाराला खुश करावे लागेल. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. लहान प्रवास संभवतो. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

मीन:- व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. मुलांशी मतभेद संभवतात.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर