31 January 2025 Horoscope in Marathi : ३१ जानेवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी आज दुपारी २ वाजेपर्यंत राहील. दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत वरियन योग जुळून येईल. शतभिषा नक्षत्र उद्या पहाटेपर्यंत ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तर आज महिन्याच्या शेवट १२ राशींसाठी काय घेऊन येणार हे आपण जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत मोफत वाचा

३१ जानेवारी पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope) :

मेष:- मोठ्या लोकांत उठबस वाढेल. जवळचे मित्र भेटतील. उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवेल. कामाची धावपळ वाढेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

वृषभ:- बोलण्यातून कामे मिळवाल. इतरांची मने जिंकून घेता येतील. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यापरिवर्गाला दिवस चांगला जाईल.

मिथुन:- कफविकाराचा त्रास जाणवू शकतो. लहान प्रवास कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. मनाची विशालता दाखवाल. धार्मिक भावना जोपासाल.

कर्क:- आवडते पदार्थ चाखाल. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदाराबरोबर गप्पा-गोष्टी कराल.कलेला पोषक वातावरण मिळेल.

सिंह:- मानसिक व्यग्रता जाणवेल. आपला ठसा उमटवाल. घरातील गोष्टी शांततेत हाताळाव्यात. वाहन विषयक कामे पार पडतील. जमिनीच्या कामात लक्ष घालाल.

कन्या:- फार काळजी करू नये. काही गोष्टी पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा. ऐशारामाच्या वस्तूंची आवड निर्माण होईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. सामाजिक बांधिलकी जपाल.

तूळ:- मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळच्या मित्रमंडळींशी गप्पांमध्ये रमून जाल. नवीन स्नेहसंबंध जोडले जातील. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

वृश्चिक:- प्रत्येक गोष्टीत समाधान मानाल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल. आनंदाने एकमेकांना मदत कराल. घरात टापटीप ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

धनु:- कौटुंबिक जबाबदारी वाढेल. गोड बोलून कामे मिळवाल. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. फोटोग्राफीची हौस पूर्ण करता येईल.

मकर:- श्रम वाढतील. आपले विचार उत्कृष्ठपणे मांडाल. हसत हसत कामे पूर्ण कराल. बौद्धिक चलाखी वापराल. योग्य तर्क वापराल.

कुंभ:- झोपेची तक्रार जाणवेल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. मानापमानाच्या गोष्टी फार मनावर घेऊ नयेत. आर्थिक गुंतवणूक सावधगिरीने करावी. काही कामे अडकून पडतील.

मीन:- लहानांशी मैत्री कराल. मानाने कामे कराल. चांगला आर्थिक लाभ होईल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. योग्य कागदपत्रे सादर करावीत.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 31 january 2025 the month of 12 zodiac signs will end sweetly read your horoscope in marathi asp