31st December Horoscope In Marathi: २०२३ वर्षातील हा शेवटचा रविवार आणि शेवटचा दिवस देखील आहे. वर्षातील शेवटच्या दिवशी कोणाची करिअरमध्ये प्रगती होईल तर कोणाला व्यवसायात चांगला नफा होईल. चला जाणून घेऊ या १२ राशींची २०२३ मधील वर्षाचा शेवटचा दिवस कसा असेल.

मेष :- तुमचा व्यवहार शालीन राहील. गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. न आवडणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराला खुश कराल. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल.

11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
today horoscope 10th November rashi bhavishya akshay navami 2024
Today Horoscope : अक्षय नवमीला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब चमकणार; लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर होणार का धनवर्षाव? वाचा राशीभविष्य
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य

वृषभ:- अचानक खर्च समोर येऊ शकतात. मानसिक व्यग्रता टाळावी. आपल्या मतावर ठाम राहावे. आज उधारी घेणे टाळावे. आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल.

मिथुन:- आज चांगला धनलाभ होईल. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. भावंडांबरोबरच्या नात्यात सुधारणा होईल. जवळचे मित्र भेटतील.

हेही वाचा – Sankashti Chaturthi 2023 : या वर्षाची शेवटची चतुर्थी! जाणून घ्या तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ

कर्क:- कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. कामाचा उरक वाढवावा. सहकार्‍याला मदत कराल. घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न राहील.

सिंह:- बिघडलेल्या गोष्टी संतुलित करता येतील. आज मनात करुणा निर्माण होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल.

कन्या:- आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. हलका आहार घ्यावा. व्यायामाला कंटाळा करू नका. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील.

तूळ:- जोडीदारासमवेत वेळ मजेत घालवाल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा कमावता येईल. तुमच्या ओळखीत वाढ होईल. सर्वांशी आपुलकीने वागाल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल.

वृश्चिक:- छुपे शत्रू माघार घेतील. कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. आपल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्याल. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.

धनू:- कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील. आजचा दिवस खेळीमेळीने घालवाल. मुलांबरोबर वेळ मजेत जाईल. रेस, सट्टा यातून लाभ संभवतो. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

मकर:-आज अधिक वेळ घरात काढाल. स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. मनातील निराशा दूर सारावी. वाहन विषयक कामे पार पडतील. मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल.

हेही वाचा – २०२४मध्ये ‘या’ राशीच्या महिला ठरतील अत्यंत भाग्यवान; मिळेल इच्छित पदोन्नती आणि पैसा

कुंभ:- आज घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. लहान भावंडे आपल्याला मदत करतील. चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे.

मीन:- कुटुंबातील व्यक्तींबाबत अतिशय दक्ष राहाल. सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. खाण्यापिण्याची हौस भागवाल. मनातील भावना व्यक्त कराल.

_ज्योतिषी विद्याधर करंदीकर