October Monthly Horoscope 2023: २९ सप्टेंबर २०२३ पासून पितृपक्ष सुरु झाला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पितृपक्षाच्या प्रभावात अत्यंत उत्तम ग्रहस्थिती असल्याचे समजतेय. तर पहिल्याच तीन दिवसांमध्ये काही महत्त्वाच्या ग्रहांचे गोचर सुद्धा होणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार १ ऑक्टोबर बुध ग्रह कन्या राशीत, २ ऑक्टोबरला शुक्र ग्रह सिंह राशीत तर ३ ऑक्टोबरला मंगळ ग्रह तूळ राशीत प्रवेश घेणार आहे. तीनही ग्रहांचे महत्त्व मोठे असल्याने या गोचरांचा प्रभाव राशिचक्रावर दिसून येऊ शकतो. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात भद्र, त्रिगही, अमृत सिद्धी, सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. याचाही शुभ प्रभाव राशी चक्रात दिसून येणार आहे. ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांनी यासंदर्भात माहिती देत १२ राशींचे ऑक्टोबर महिन्यातील राशिभविष्य सांगितले आहे.

ऑक्टोबर महिना तुमच्या राशीसाठी कसा असणार?

मेष रास (Aries Monthly Horoscope)

विवाहीत दाम्पत्यांनी एकमेकांच्या न पटणाऱ्या मुद्द्यांवर वाद टाळावा. काही ‘गोष्टी जशा आहेत तशा’ स्वीकारणे लाभकारक ठरेल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनतीचे फळ चांगले मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी व्यवसायाशी निगडीत कामांना प्राधान्य दिल्याने प्रगतीचा वेग वाढेल. नव्या ओळखीतून फायदा होईल. उच्चपद भूषवाल. जबाबदाऱ्या पार पाडताना हलगर्जीपणा नसावा. श्वसन आणि रक्ताभिसरण या संबंधात त्रास उदभवण्याची शक्यता आहे. प्राणायामाचा सराव उपयोगी पडेल.

Shani Nakshatra Parivartan 2024
२७ डिसेंबरपासून चमकेल ‘या’ राशींचे नशीब अन् होणार धनलाभ; शनीच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेशाने येईल आभाळभर सुख
Makar Sankranti
मकर संक्रांतीच्या दिवसापासून ‘या’ पाच राशींची होणार चांदी,…
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Astrology Predictions Number 2 in Marathi
Astrology Predictions Number 2: तुमचा वाढदिवस ‘या’ तारखांना असतो का? २०२५ मध्ये नोकरी-व्यवसायात मंगळ करेल मालामाल? ज्योतिष सांगतात…
Shani Shukra yuti 2024 | saturn and venus conjunction
वर्षाच्या शेवटी ‘या’ राशींच्या आयुष्यात सुरू होणार संकटांची मालिका! शनी-शुक्राच्या संयोगाने करिअर, व्यवसायात येतील अडचणी?
Aries To Pisces Horoscope Today in Marathi
२६ डिसेंबर पंचांग: शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी १२ पैकी ‘या’ राशींना लक्ष्मीकृपेने मिळेल मेहनतीचे फळ; तुमच्या कुंडलीत धन की कष्ट?
Surya Nakshatra Gochar 2024
२९ डिसेंबरपासून मिळणार छप्परफाड पैसा! सूर्यदेवाच्या कृपेने चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब
Shani Nakshatra Gochar
Shani Nakshatra Gochar 2024 : दोन दिवसानंतर शनि देव करणार नक्षत्र परिवर्तन; या तीन राशींचा सुरू होणार राजयोग, अपार पैसा-संपत्ती मिळणार
25 December Rashi Bhavishya In Marathi
२५ डिसेंबर पंचांग: चारचौघात कौतुक ते अचानक धनलाभ; पंचांगानुसार आज तुमची रास ठरेल का भाग्यवान? वाचा राशिभविष्य

वृषभ रास (Taurus Monthly Horoscope)

चांगल्या लोकांच्या भेटीगाठी झाल्याने व्यवसायाची प्रगती होईल. स्थावर मालमत्तेसंबंधीत निर्णय घ्याल. नवी जागा खरेदी वा असलेल्या स्थावर मालमत्तेची विक्री करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. प्रत्यक्षात व्यवहार पूर्ण झाला नाही तरी या विषयीच्या कामाला चालना मिळेल. विवाहीत दाम्पत्यांनी एकमेकांना वेळ देण्याची गरज भासेल. स्वतःच्या उन्नतीसह कुटुंबाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न कराल. षष्ठ स्थानातील रवी, मंगळ, केतू या उष्ण ग्रहांमुळे वातावरणाशी मिळजुळते घेताना काळजी घ्यावी.

मिथुन रास (Gemini Monthly Horoscope)

रवी, मंगळ, केतू, बुध या ग्रहांच्या योगामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. अवतीभोवती असलेली अनेक प्रलोभने आपणास अस्वस्थ करतील. अशा वेळी लाभकारक गुरुचे साहाय्य मिळेल. नोकरी व्यवसायात देखील निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. वैवाहिक जीवनात एकमेकांची साथ उपयोगी पडेल. संतती प्राप्तीच्या बाबतचे प्रयत्न लांबणीवर पडतील. गुंतवणूकदारांनी थोडा संयम ठेवावा. वातावरणातील बदल, प्रदूषण यामुळे डोकं जड होणे, चक्कर येणे यावर औषधोपचार घ्यावा.

कर्क रास (Cancer Monthly Horoscope)

गुरू शुक्राचा शुभ योग हा आपले सादरीकरण प्रभावी करेल. नोकरी व्यवसायानिमित्त होणारी सभा, संमेलने गाजवाल. इतरांवर आपली छाप पडेल. विद्यार्थी वर्गाला मन एकाग्र करण्याची गरज भासेल. आसपासच्या प्रलोभनांमुळे अभ्यासात व्यत्यय येईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विवाहोत्सुक मंडळींनी धीर धरावा. देशांतर्गत प्रवास कामी येतील. ऋतुचक्रातील बदल मानवणार नाही. तब्येतीच्या बारीकसारीक तक्रारी उदभवतील.

सिंह रास (Leo Monthly Horoscope)

धन स्थान आणि पराक्रम स्थान यातून होणारे रवी, बुधाचे भ्रमण धन संपत्तीच्या दृष्टीने लाभकारी असेल. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केलेली गुंतवणूक चांगला धनलाभ मिळवून देईल. नोकरी व्यवसायात बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठे प्रकल्प हाताळाल. गुरुबल चांगले असल्याने प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. विद्यार्थी वर्गाला आपल्यातील बऱ्या वाईट गोष्टी, बलवत्ता, कमजोरी यांची जाणीव होईल. विवाहीत दाम्पत्यांना एकमेकांसाठी पुरेसा वेळ राखून ठेवावा लागेल.

कन्या रास (Virgo Monthly Horoscope)

द्वितीय स्थानातील मंगळ, रवी, केतू सारखे उष्ण ग्रह कौटुंबिक वातावरण तप्त करतील. प्रकरण जास्त ताणू नये. नातेसंबंधातील दरी कशी मिटवता येईल हे पाहावे. गुरुबल कमजोर असल्याने इतरांचा रोष ओढवून घेऊ नका. नोकरी व्यवसायात कामाचा अतिरिक्त बोजा वाढेल. संयम बाळगावा. विद्यार्थी वर्गाने हिमतीने पुढे जावे. मेहनतीला पर्याय नाही. बुद्धिमत्तेला सातत्याची जोड मिळणे आवश्यक आहे. विवाहीत दाम्पत्यांनी एकमेकांचे व्यक्तिस्वातंत्र्य जपावे. मूत्रविकार, जळजळ, इन्फेक्शन यांची काळजी घ्यावी.

तूळ रास (Libra Monthly Horoscope)

आपल्या राशीत रवी, मंगळ, केतू हे तीन उष्ण ग्रह येणार आहेत. नेहमीचा वैचारिक समतोल ढासळू शकतो. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली नाहीत त्या गोष्टींबाबत डोक्यात राग घालून घेऊ नका. नोकरी व्यवसायात चढ उतार अनुभवायला मिळतील. गुरुबल चांगले असल्याने परिस्थितीतून तरून जाल. विद्यार्थी वर्गाने अतिरिक्त आत्मविश्वास टाळावा. गुरुजनांचे मार्गदर्शन कामी येईल. विवाहोत्सुक मंडळींना चांगला योग आहे. त्वचा विकार, डोकेदुखीचा त्रास होईल.

वृश्चिक रास (Scorpio Monthly Horoscope)

अनावश्यक आणि अनाठायी खर्च टाळलात, तरच महिन्याचे आर्थिक गणित जुळेल. नोकरी निमित्ताने केलेल्या प्रवासात अडचणी येतील. सर्व बाजूंनी सावधगिरी बाळगावी. जोडीदारासह चांगले जुळेल. विद्यार्थीवर्गाने परीक्षेची कसून तयारी करावी. न डगमगता धीराने पुढे जावे. घरीदारी, कामाच्या ठिकाणी नातेसंबंध जपा. शब्द जपून वापरा. एखाद्याची एखादी कृती चुकीची असली म्हणजे ती व्यक्ती संपूर्ण चूक नसते हे ध्यानात ठेवा. डोळे आणि उत्सर्जन संस्थेचे आरोग्य जपावे.

धनु रास (Sagittarius Monthly Horoscope)

बेधडकपणे पुढे जाण्याची हिंमत मिळेल. आर्थिक आलेख उंचावेल. नोकरीत कष्ट आणि प्रामाणिकपणा यांची दखल घेतली जाईल. शनी व गुरूच्या साथीने तसेच शुक्राच्या प्रभावाने व्यवसायात उन्नती होईल. मोठी भरारी घ्यायची तयारी ठेवा. संधीचे सोने करा. विद्यार्थी वर्गाला प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा यात विशेष यश मिळेल. विवाहोत्सुक मंडळींसाठी ग्रहमान चांगले आहे. जोडीदाराची साथ सोबत प्रशंसनीय असेल. आमवातामुळे सांधे आखडतील. वैद्यकीय सल्ला व उपचारांची गरज भासेल.

मकर रास (Capricorn Monthly Horoscope)

नोकरी व्यवसायात रवी, मंगळ, बुधाचे पाठबळ उत्तम मिळणार आहे. धडाडीने पुढे जाल. आत्मविश्वास बळावेल. विद्यार्थी वर्गाला अडीअडचणींचा सामना करत पुढे जावे लागेल. जोडीदारासह वादविवाद न घालता एकमेकांचे विचार समजून घ्यावेत. गुंतवणूकदारांना आपल्या पैशाचा परतावा भरपूर मिळेल. स्थावर मालमत्तेची खरेदी, विक्री करताना जागरूक राहावे. आरोग्य चांगले राहील. नियमित व्यायाम आणि प्राणायाम उपयुक्त ठरेल.

कुंभ रास (Aquarius Monthly Horoscope)

भाग्यकारक ग्रहमानामुळे मेहनत फळास येईल. कामाचा बोजा हलका होईल. नोकरीतील आव्हाने सहजपेलाल. व्यवसायात नवी झेप घेण्याची तयारी कराल. संशोधन महत्वाचे ठरेल. विद्यार्थी वर्गाला ग्रहमान साहाय्यकारी आहे. संधीचे सोने करावे. जोडीदारासह उत्तम सूर जुळतील. एकमेकांच्या कामाचे कौतुक वाटेल. विवाहोत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळेल. परदेशी प्रवासाचा योग आहे. संतती प्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील.

३० वर्षांनी पितृपक्षात अमृत व सर्वार्थ सिद्धी योग बनल्याने ‘या’ ५ राशींना लाभणार वाडवडिलांची कृपा; होऊ शकता श्रीमंत

मीन रास (Pisces Monthly Horoscope)

कामामुळे डोकेदुखी वाढेल. ताणतणाव सहन करावा लागेल. वेळेचे नियोजन केलेत तरच कामे मार्गी लागतील. नोकरीच्या कामकाजात अनेक अडथळे पार करत पुढे जायचे आहे. धीर सोडू नका. व्यावसायिकांना हिंमत दाखवावी लागेल. तसे केलेत तरच आपला टिकाव लागेल. व्यावहारिक दृष्टिकोन खूप उपयोगी पडेल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक गोष्टी आसपास असतील. जोडीदाराच्या सोबतीने कठीण काळातून मार्ग निघेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader