1 January 2024 Planetary Transit: २०२३ ला निरोप देण्यासाठी आता शेवटचे काही दिवस बाकी आहेत. नवीन वर्षात नवीन जोमाने प्रवेश करण्यासाठी आपणही उत्सुक असाल. २०२३ हे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी देवाचे वर्ष म्हणून ओळखले गेले होते तर आता २०२४ मध्ये सुद्धा शनी, मंगळ, व गुरु-शुक्राच्या उलाढालींना जोर धरणार आहे. २०२४ हे येणारे वर्ष अनेक राशींसाठी आयुष्याला ३६० अंशात कलाटणी देऊन जाणारे पर्व असेल. अगदी वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून प्रचंड लाभदायक व शुभ असे राजयोग सुद्धा निर्माण होणार आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार १ जानेवारी २०२४ ला म्हणजेच वर्षाच्या पहिल्याच दिवशी ४ अत्यंत शुभ योग निर्माण होत आहेत. ज्याचा प्रभाव राशीचक्रातील १२ राशींवर दिसून येणार आहे. या राशींच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, धनसंपदा व आनंदाचा प्रवेश होऊ शकणार आहे. नेमके हे राजयोग कोणते व ते कसे तयार होत आहेत हे पाहूया..

१ जानेवारी २०२४ ला निर्माण होत आहेत ‘हे’ ४ शुभ राजयोग

आयुष्मान योग

ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार १ जानेवारी २०२४ ला आयुष्यमान योग तयार होत आहे. २ जानेवारी पहाटेपर्यंत या योगाचा कालावधी कायम असणार आहे. या कालावधीत मकर व मिथुन राशीच्या लोकांसाठीचार राजयोग अतिशय शुभ सिद्ध होऊ शकतात. या लोकांना अचानक धनलाभ संभवतो. तसेच नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी उपलब्ध झाल्याने मिळकतीत वाढ होऊ शकते.

Guru Margi 2025
३ दिवसानंतर ‘या’ पाच राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार, गुरूच्या कृपेने मिळेल अपार पैसा, धन- संपत्ती अन् यश
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Shani Transit 2025
येणारे ६५ दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
shukra gochar 2025
धनलाभ होणार, बक्कळ पैसा मिळणार! १ फेब्रुवारीपर्यंत ‘या’ तीन राशींना शुक्र देणार भौतिक सुख अन् ऐश्वर्य
Rahu ketu gochar
राहू-केतू देणार पैसाच पैसा; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींचे चमकेल भाग्य अन् मिळेल प्रत्येक कामात यश
guru-vakri-2025-jupiter-retrograde-in-taurus-these-zodiac-sign-will-be-lucky
२०२५मध्ये पुढील ८० दिवस गुरू होणार वक्री! ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल पैसाच पैसा

लक्ष्मी नारायण योग

अभ्याकसंच्या माहितीनुसार १ जानेवारी २०२४ ला ज्योतिषशास्त्रातील सर्वाधिक लाभदायक व शुभ असा मानला जाणारा लक्ष्मी नारायण राजयोग सुद्धा तयार होत आहे. हा योग बुध व शुक्र ग्रहाच्या युतीने तयार होणार असून यामुळे प्रभावित राशींच्या वैवाहिक जीवनात अत्यंत शुभ बदल घडून येतील. मुख्यतः धनु व वृश्चिक राशीवर या राजयोगांचा प्रभाव असण्याचा अंदाज आहे.

गजकेसरी योग

नववर्षाच्या सुरुवातीला गणपती व लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने संपन्न असा गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. या दिवशी चंद्र सिंह राशीत विराजमान असणार आहे तर गुरुदेव मेष राशीत मार्गी स्थितीत असणार आहेत. थेट युती होत नसली तरी गोचर कक्षा समोरासमोर आल्याने हा राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगाने प्रभावित मंडळींना बुद्धीच्या बळावर प्रगतीची चिन्हे आहेत. वाणीवर नियंत्रण ठेवल्यास यश आपल्याच दिशेने चालून येत आहे.

हे ही वाचा<< २७ डिसेंबर पंचांग: ब्रम्ह योगासह आजच्या दिवशी कोणत्या राशींना होईल नफा; ‘या’ शत्रूंपासून रहा सावध

आदित्य मंगल योग

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार १ जानेवारी २०२४ ला मंगळ व शनीदेव दोघेही धनु राशीत प्रभावशाली असणार आहेत. या दोन्ही ग्रहांचे लाभदायक प्रभाव एकत्र आल्याने आदित्य मंगल राजयोग तयार होत आहे. नावाप्रमाणेच यावेळी सूर्यदेव सुद्धा प्रभावित राशींना प्रगतीपथावर आणण्याचे काम करू शकतात. वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्यावर धनवर्षाव होण्याची चिन्हे आहेत. करिअरमध्ये प्रगती करता येईल, जुन्या गुंतवणुकीचे लाभ प्राप्त होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader