1 January 2024 Planetary Transit: २०२३ ला निरोप देण्यासाठी आता शेवटचे काही दिवस बाकी आहेत. नवीन वर्षात नवीन जोमाने प्रवेश करण्यासाठी आपणही उत्सुक असाल. २०२३ हे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी देवाचे वर्ष म्हणून ओळखले गेले होते तर आता २०२४ मध्ये सुद्धा शनी, मंगळ, व गुरु-शुक्राच्या उलाढालींना जोर धरणार आहे. २०२४ हे येणारे वर्ष अनेक राशींसाठी आयुष्याला ३६० अंशात कलाटणी देऊन जाणारे पर्व असेल. अगदी वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून प्रचंड लाभदायक व शुभ असे राजयोग सुद्धा निर्माण होणार आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार १ जानेवारी २०२४ ला म्हणजेच वर्षाच्या पहिल्याच दिवशी ४ अत्यंत शुभ योग निर्माण होत आहेत. ज्याचा प्रभाव राशीचक्रातील १२ राशींवर दिसून येणार आहे. या राशींच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, धनसंपदा व आनंदाचा प्रवेश होऊ शकणार आहे. नेमके हे राजयोग कोणते व ते कसे तयार होत आहेत हे पाहूया..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा