3rd Feb 2024 Marathi Horoscope: ३ फेब्रुवारी २०२४ च्या दिवशी पौष कृष्ण पक्षातील नवमी तिथीवर काही खास योग जुळून येत आहेत. काही राशींवर अशुभ प्रभाव पडू शकतो. काहींना आपले म्हणणे सिद्ध करता येईल तर काहींना माघार घ्यावी लागेल. आर्थिक मिळकतीच्या बाबत सुद्धा काही बदल जाणवणार आहेत. यापैकी तुमच्या राशीत नेमके काय बदल लिहून ठेवलेले आहेत हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष:-योग्यप्रकारे आकलन करू शकाल. आपले विचार तरलपणे मांडाल. मुलांच्या सहवासात रमाल. अभ्यासू दृष्टिकोन ठेवाल.

वृषभ:-तुमच्या मताचा आदर केला जाईल. घरातील कामात अधिक लक्ष घालावे. तुमचा रुबाब राहील. काहीवेळा माघार घ्यावी लागेल. शिस्तीचा बडगा करू नका.

मिथुन:-मजेत प्रवास कराल. हातात काही नवीन गोष्टी येतील. सढळपणे इतरांना मदत कराल. गंभीरपणे विचार कराल. वैचारिक प्रौढता दाखवाल.

कर्क:-आपल्याच मतावर आग्रही राहाल. आवडी-निवडीबाबत ठाम भूमिका घ्याल. गोड बोलण्यावर भर द्याल. दिवस घरातील कामात व्यतीत होईल. जोडीदाराचा विचार जाणून घ्याल.

सिंह:-तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. सर्वांशी आदराने वागाल. वागण्यातून इतरांवर चांगली छाप पाडाल. भावनाशीलतेने विचार कराल. जोडीदाराचे प्रेम सौख्य वाढेल.

कन्या:-लिखाणात मन रमवाल. बुद्धीवादी विचार कराल. तुमच्यातील धाडस वाढेल. स्वबळावर विश्वास ठेवावा. स्वभावात काहीसा कठोरपणा येईल.

तूळ:-आर्थिक जबाबदारी वाढेल. गोष्टींची उपयुक्तता लक्षात घ्यावी. अनाठायी होणार खर्च टाळावा. अधिकारात वाढ संभवते. तिखट पदार्थ चाखाल.

वृश्चिक:-ऊर्जेने कामे हाती घ्याल. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. काही गोष्टीत विरोध होऊ शकतो. कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्याल. स्नायू धरणे यांसारखे त्रास जाणवतील.

धनु:-नातलग भेटतील. इतरांचे कौतुक कराल. उत्कृष्ट काव्यस्फूर्ती लाभेल. प्रवासाची हौस पूर्ण कराल. आनंददायी दृष्टकोन ठेवाल.

मकर:-गायन कलेला चांगला वाव मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. महिला दागदागिने खरेदी करतील. सामाजिक कार्यात हातभार लावाल. सर्वांशी गोडीने वागाल.

कुंभ:-फॅशनची हौस पूर्ण करता येईल. प्रत्येक गोष्टींचा रसास्वाद घ्याल. उत्तम व्यक्तिमत्वाची छाप पडेल. बोलण्यात माधुर्य ठेवाल. चांगले विवाह सुख लाभेल.

हे ही वाचा << ५० वर्षांनी शनि महाराजांच्या राशीत ‘त्रिग्रही योग’ बनल्याने फेब्रुवारीमध्ये ‘या’ राशींचे चांगले दिवस? लक्ष्मी येऊ शकते दारी

मीन:-प्रवासात काळजी घ्यावी. कामाची तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. उपासनेला बळ मिळेल. स्वकष्टावर कामे करण्याकडे कल राहील. वरिष्ठांची मर्जी राखावी.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3rd feb panchang marathi paush shanivar mesh to meen daily horoscope who will earn money who will get cranky today astro svs