Zodiac Signs Daily Horoscope In Marathi : ४ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी दुपारी १ वाजून ११ मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज संध्याकाळी ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत पूर्वाषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. तसेच बुधवारी गंड योग १ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच राहू काळ दुपारी १२ वाजता सुरु होईल ते दुपारी १ वाजून ३० मिनिटांपर्यंत राहील. तर आजचा दिवस मेष ते मीनसाठी कसा राहील हे आपण जाणून घेऊया…

०४ नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य

मेष:- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. मानसिक गोंधळ उडू शकतो. अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. अति विचारात वेळ वाया घालवू नका.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

वृषभ:- जोडीदारासमवेत वेळ मजेत घालवाल. जवळचे नातेवाईक भेटतील. भागिदारीतून चांगला लाभ होईल. चारचौघात तुमचे कौतुक केले जाईल. तुमचा हट्ट पुरवला जाईल.

मिथुन:- आजूबाजूच्या लोकांना ज्ञान वाटाल. नवीन आव्हानांना सामोरे जाल. सर्व कामे सावधगिरीने करावीत. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. कामात सहकार्‍यांची मदत घेता येईल.

कर्क:- प्रेमी लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आवडते छंद जोपासता येतील. दिवस गमती-जमतीत घालवाल. खास व्यक्तीची गाठ पडेल. नवीन काहीतरी शिकायला मिळेल.

सिंह:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरासाठी काहीतरी नवीन खरेदी कराल. सजावटीकडे विशेष लक्ष द्याल. अधिक वेळ घरासाठी द्याल. आईची तब्येत सुधारेल.

कन्या:- साहसी ठिकाणी फिरायला जाल. भावंडांकडून भेट वस्तु मिळेल. तुमच्या धैर्यात वाढ होईल. नवीन कामे उत्साहाने हाती घ्याल. पराक्रम दाखवण्याची संधी मिळेल.

तूळ:- कुटुंबासमवेत अधिक वेळ घालवाल. आवडीचे पदार्थ खाल. दिवस मनाजोगा घालवाल. जोडीदाराच्या तक्रारी सोडवाल. संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर जाल.

वृश्चिक:- स्वभावात चांगले बदल दिसून येतील. भूतकाळात फार रमून जाऊ नका. आवडीच्या गोष्टी करण्यावर अधिक भर द्यावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवाल. आपल्या मतावर ठाम राहाल.

धनू:- बजेट बिघडणार नाही याकडे लक्ष द्या. मानसिक गोंधळ वाढवून घेऊ नका. मनातील चिंता दूर साराव्यात. दूरच्या प्रवासाचा योग येईल. आध्यात्मिक कार्यात रस घ्याल.

मकर:- मनातील इच्छा पूर्ण होईल. जुने मित्र भेटतील. दिवस मजेत जाईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल.

कुंभ:- कामातील चंचलता टाळावी. फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केन्द्रित करावे. कामातील उरक वाढवावा लागेल. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. व्यापारी नवीन काम सुरू करू शकतात.

मीन:- परोपकाराची भावना जागृत ठेवावी. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. आज नशीबाची उत्तम साथ मिळेल. जुनी कामे मार्गी लावू शकता. दिवस समाधानात जाईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader