Shani Ravi Pushya Yog in November 2023: नोव्हेंबर महिना हा विविध दुर्लभ राजयोगांनी व महत्त्वपूर्ण ग्रह गोचरांचा ठरणार आहे. महिन्याच्या सुरवातीलाच शुक्र गोचर होणार असून दिवाळीच्या आधी शनीदेव कुंभ राशीत मार्गी होणार आहेत. दिवाळीच्या आधीच सलग दोन दिवस रवी पुष्य नक्षत्र योगासह सलग आठ राजयोग जुळून येणार आहेत. येत्या ४ नोव्हेंबरला शनी पुष्य व ५ नोव्हेंबरला रवी पुष्य योग जुळून येत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार पुष्य नक्षत्रात अशाप्रकारचा दुर्मिळ योग हा तब्बल ४०० वर्षांनी जुळून येत आहे. दिवाळीच्या आधी खरेदीसाठी हा काळ शुभ असणार आहे. या दुर्मिळ योगायोगाचा प्रभाव काही राशींवर अत्यंत शुभ रूपात असणार आहे. या योगाविषयी व त्यामुळे शुभ प्रभाव अनुभवू शकणाऱ्या राशींविषयी जाणून घेऊया..
शनी-रवि पुष्य नक्षत्र योग कधी व कसा तयार होतोय?
४ नोव्हेंबर २०२३ ला शनिवारी सकाळी ८ वाजता पुष्य नक्षत्र सुरु होणार आहे तर रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत हा शुभ योग कायम असणार आहे. हे दोन्ही दिवस शनिवार व रविवार असल्याने पुष्य नक्षत्रात रवी व शनी योग जुळून येत आहेत. ४ नोव्हेंबरला शनिवारी अन्य अष्ट महाराजयोग तयार होत आहेत.
ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर २०२३ ला शंख, लक्ष्मी, शश, हर्ष, सरल, साध्य, मित्र व गजकेसरी योग जुळून येणार आहेत. या दिवशी शनी आपल्याच राशीत १८० अंशात मार्गी असणार आहेत.
हे ही वाचा<< लक्ष्मी नारायणाच्या कृपेने कार्तिक महिन्यात ‘या’ राशींना लाभणार प्रचंड पैसा! ४८ तासांनंतर सुरु होणार सोन्यासम दिन
शनी- रवी पुष्य नक्षत्रात कोणत्या राशींना होणार धनलाभ?
ज्योतिषशास्त्रानुसार या राजयोगांचा प्रभाव दिवाळीपूर्वी शनी व गुरूच्या आशीर्वादाच्या रूपात काही राशींना अनुभवता येणार आहे. या कालावधीत मेष, मिथुन, कर्क, धनु, मकर व कुंभ राशीला विशेष लाभ होण्याची चिन्हे आहेत. शनी व गुरूमुळे लक्ष्मी माता या राशींना धनलाभाच्या रूपात प्रगतीची संधी देऊ शकते. विशेषतः तुमची थांबलेली कामे पुन्हा सुरु होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आलेली मरगळ दूर होण्यास मदत होऊ शकते. दिवाळीच्या आधी जुन्या गुंतवणुकीचा लाभ होऊन तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)