4th June Panchang & Marathi Rashi Bhavishya: ४ जून २०२४ ला वैशाख कृष्ण पक्षातील त्रयोदशी आहे. आज, मंगळवारी रात्री १० वाजून १ मिनिटापर्यंत त्रयोदशी तिथी कायम असणार आहे. संपूर्ण दिवस व रात्री १० वाजून ३५ मिनिटांपर्यंत भरणी नक्षत्र जागृत असेल. द्रिक पंचांगानुसार आज, सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी शोभना योग संपल्यावर मग आजपासून ते ५ जूनपर्यंत अतिगंध योग कायम असणार आहे. आज मंगळ प्रदोष व्रत असणार आहे. आजचा दिवस तसा शुभ असून दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे. आज सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत तब्बल ५५ मिनिटांचा कालावधीत अभिजात मुहूर्त असणार आहे. आज देशभरात लोकसभा निवडणुकांचे निकाल असल्याने हा दिवस तसाही अत्यंत महत्त्वाचा आहे, या दिवशी तुमच्या राशीनुसार नशीब कशी कलाटणी घेणार हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-मानसिक गोंधळ सावरावा लागेल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. इतरांना उदारपणे मदत कराल. गोडीने सर्वांना आपले मत पट‍वून द्याल. आर्थिक चिंता दूर होईल.

वृषभ:-स्वत:चे स्वत्व राखण्याचा प्रयत्न कराल. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. मनातील इच्छा हवी तशी पूर्ण होईल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम प्रकारे आनंद घ्याल. काही कामे क्षुल्लक कारणास्तव रखडली जातील.

मिथुन:-जलद गतीने कामे पूर्ण कराल. क्षुल्लक कारणास्तव येणारी निराशा दूर सारावी. प्रतिकूलतेतून वेळेवर मार्ग निघेल. किरकोळ अडचणीमुळे खट्टू होऊ नका. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

कर्क:-तुमच्या धार्मिकतेत वाढ होईल. जामीनकीचे व्यवहार तूर्तास टाळा. खोटे बोलण्याने नुकसान संभवते. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटतील. कागदपत्रांची नीट तपासणी करून पुढे जावे.

सिंह:-आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी खटपट कराल. कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभर झटाल. हातातील अधिकार वापरण्याची संधी मिळेल. मानसिक चंचलता जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.

कन्या:-जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. भागीदारीच्या व्यवसायात उत्कृष्ट लाभ मिळेल. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. व्यावहारिक चातुर्य दाखवावे लागेल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा.

तूळ:-केलेल्या कामातून समाधान मिळेल. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. ठामपणे निर्णय घेणे गरजेचे आहे. कामातील शिस्त मोडून चालणार नाही. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

वृश्चिक:– अती विचाराने ताण येईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

धनू:-व्यापारातून चांगला नफा संभवतो. पत्नीची व्यवहारकुशलता दिसून येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामात वडीलधार्‍यांचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा.

मकर:-तुमच्या विषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. जुन्या गोष्टी उकरून काढत बसून नका. सकारात्मक विचारसरणीतून मार्गक्रमण करावे. कफ विकाराचा त्रास संभवतो. अविचाराने निर्णय घेऊ नका.

कुंभ:-मुलांशी गप्पागोष्टी करण्यात रमून जाल. कामे अधिक जोमात पार पाडाल. चटकन येणार्‍या रागावर आवर घालावा. पुढील काळासाठी उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवा. आवडते पदार्थ खायला मिळतील.

हे ही वाचा<< मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग

मीन:-मुलांवरील खर्च वाढू शकतो. जवळचे नातेवाईक गोळा होतील. मनाची द्विधावस्था टाळावी लागेल. वादाच्या मुद्द्यापासून चार हात दूर रहा. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4th june loksabha election result day panchang marathi rashi bhavishya mesh to meen who will win in life money health success marathi astrology svs
First published on: 03-06-2024 at 19:02 IST