5 january 2024 rashi bhavishya in marathi: आज ५ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी रविवार रात्री ८ वाजून १६ मिनिटांपर्यंत राहील. ५ जानेवारी रोजी संपूर्ण दिवस पूर्ण केल्यानंतर पहाटे ४ वाजून ५१ मिनिटांपर्यंत वरियान योग राहील. जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करणार असाल तर ते वरियान योगात करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तसेच पूर्वाभाद्रपद नक्षत्र रविवारी रात्री ८ वाजून १८ मिनिटांपर्यंत राहील. तर आज राहू काळ सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांपासून सुरू होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आज नववर्षाचा पहिलाच रविवार आहे, तर वरियान नक्षत्रात मेष ते मीनचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊयात…

५ जानेवारी पंचांग व राशिभविष्य : (5 January 2024 Horoscope)

daily horoscope 6 january 2025 in marathi
६ जानेवारी पंचांग: आज शनीचा उत्तरभाद्रपद नक्षत्र १२ पैकी ‘या’ राशींना करेल श्रीमंत; तुमच्या नशिबात कसे येईल सुख?वाचा राशीभविष्य
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
From Makar Sankranti the locks of luck of these 5 zodiac signs
मकर संक्रातीपासून ‘या’ ५ राशींच्या नशीबाचे टाळे उघडणार! चांगले दिवस सुरू होणार, सूर्याच्या कृपेने भाग्य चमकणार
Mangal Margi 2025 horoscope
२१ जानेवारीपासून ‘या’ राशींचे झटक्यात पालटणार नशीब; मंगळ मार्गीमुळे मिळणार बक्कळ पैसा, संपती, जबरदस्त यश
2nd november 2024 rashi bhavishya
२ नोव्हेंबर पंचांग: पाडव्याला नात्यात येईल गोडवा तर व्यवसायात होईल फायदा; तुमच्या नशिबात कोणत्या प्रकारात येईल सुख? वाचा राशिभविष्य
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य

मेष:- शारीरिक दृष्ट्‍या सक्षम राहाल. आजचा दिवस व्यस्त असेल. जवळचा प्रवास घडेल. उत्साहाने व जोमाने कामे तडीस न्याल. आर्थिक प्रश्न सुटेल.

वृषभ:- शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना दिवस लाभदायक असेल. धार्मिक कामात मदत नोंदवाल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. थोरांचे आशीर्वाद घेता येतील. उत्कृष्ट कल्पनाशक्ती लाभेल.

मिथुन:- कोणतीही चर्चा जास्त वेळ ताणू नका. अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकता. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे.

कर्क:- जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संयमी भूमिका घ्यावी लागेल. नवीन योजनांवर अंमल करू शकाल. अचानक मूड बदलू शकेल. छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होऊ नका.

सिंह:- नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. सहकार्‍यांशी संयमी भूमिकेतून वागावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विरोधकांकडे विशेष लक्ष द्यावे. गुप्त शत्रूंकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या:- पूर्वी शिकलेल्या गोष्टीतून लाभ मिळू शकेल. तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. मनातील प्रेमभावना व्यक्त करता येईल. नवीन पुस्तक खरेदी करू शकता. नवीन गोष्टीत रस घ्याल.

तूळ:- कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. घरातील थोरांच्या मतांचा आदर करावा. आपले विचार प्रभावीपणे मांडावेत. घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. मनातील चिंता दूर होतील.

वृश्चिक:- पराक्रमात वाढ होईल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. सहकार्‍यांशी असणारे संबंध सुधारतील. भावंडांना मदत कराल. अति उत्साहात नसते उद्योग करू नका.

धनू:- कौटुंबिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. घाईने कोणतेही काम करायला जाऊ नका. दिवस आनंदात जाईल. बोलण्यात माधुर्य राखाल. चांगला आर्थिक लाभ संभवतो.

मकर:- कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. नवीन विचारांना चालना द्यावी. जोडीदारासोबत मन मोकळ्या गप्पा होतील. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. भविष्याची चिंता करत बसू नका.

कुंभ:- काही खर्च अचानक सामोरे येतील. आपल्या मतावर ठाम राहावे. आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. कोर्ट कचेरीची कामे वेळ घेतील. मानसिक व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा.

मीन:- कौशल्याने वागाल. व्यापार्‍यांना उत्पन्नात वाढ होईल. नवीन खरेदी करता येईल. जुने सहकारी भेटतील. मोठ्या भावंडांची मदत होईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader