5 january 2025 rashi bhavishya in marathi: आज ५ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी रविवार रात्री ८ वाजून १६ मिनिटांपर्यंत राहील. ५ जानेवारी रोजी संपूर्ण दिवस पूर्ण केल्यानंतर पहाटे ४ वाजून ५१ मिनिटांपर्यंत वरियान योग राहील. जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य करणार असाल तर ते वरियान योगात करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तसेच पूर्वाभाद्रपद नक्षत्र रविवारी रात्री ८ वाजून १८ मिनिटांपर्यंत राहील. तर आज राहू काळ सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांपासून सुरू होईल ते ६ वाजेपर्यंत असणार आहे. त्याचप्रमाणे आज नववर्षाचा पहिलाच रविवार आहे, तर वरियान नक्षत्रात मेष ते मीनचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५ जानेवारी पंचांग व राशिभविष्य : (5 January 2025 Horoscope)

मेष:- शारीरिक दृष्ट्‍या सक्षम राहाल. आजचा दिवस व्यस्त असेल. जवळचा प्रवास घडेल. उत्साहाने व जोमाने कामे तडीस न्याल. आर्थिक प्रश्न सुटेल.

वृषभ:- शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना दिवस लाभदायक असेल. धार्मिक कामात मदत नोंदवाल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. थोरांचे आशीर्वाद घेता येतील. उत्कृष्ट कल्पनाशक्ती लाभेल.

मिथुन:- कोणतीही चर्चा जास्त वेळ ताणू नका. अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकता. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे.

कर्क:- जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संयमी भूमिका घ्यावी लागेल. नवीन योजनांवर अंमल करू शकाल. अचानक मूड बदलू शकेल. छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होऊ नका.

सिंह:- नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. सहकार्‍यांशी संयमी भूमिकेतून वागावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विरोधकांकडे विशेष लक्ष द्यावे. गुप्त शत्रूंकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या:- पूर्वी शिकलेल्या गोष्टीतून लाभ मिळू शकेल. तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. मनातील प्रेमभावना व्यक्त करता येईल. नवीन पुस्तक खरेदी करू शकता. नवीन गोष्टीत रस घ्याल.

तूळ:- कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. घरातील थोरांच्या मतांचा आदर करावा. आपले विचार प्रभावीपणे मांडावेत. घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. मनातील चिंता दूर होतील.

वृश्चिक:- पराक्रमात वाढ होईल. आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. सहकार्‍यांशी असणारे संबंध सुधारतील. भावंडांना मदत कराल. अति उत्साहात नसते उद्योग करू नका.

धनू:- कौटुंबिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. घाईने कोणतेही काम करायला जाऊ नका. दिवस आनंदात जाईल. बोलण्यात माधुर्य राखाल. चांगला आर्थिक लाभ संभवतो.

मकर:- कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. नवीन विचारांना चालना द्यावी. जोडीदारासोबत मन मोकळ्या गप्पा होतील. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. भविष्याची चिंता करत बसू नका.

कुंभ:- काही खर्च अचानक सामोरे येतील. आपल्या मतावर ठाम राहावे. आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. कोर्ट कचेरीची कामे वेळ घेतील. मानसिक व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा.

मीन:- कौशल्याने वागाल. व्यापार्‍यांना उत्पन्नात वाढ होईल. नवीन खरेदी करता येईल. जुने सहकारी भेटतील. मोठ्या भावंडांची मदत होईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 january rashi bhavishya in marathi 5 january 2025 horoscope sunday rashi mesh to meen aries to pisces will get money dvr