आचार्य चाणक्य मानतात की तुमच्या वैयक्तिक गोष्टी आहेत, त्या तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. कारण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही आपला व्यक्ती म्हणून म्हणता आणि असे लोक तुमच्या त्रासाचे कारण बनतात. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणाला सांगू नका, असं सांगण्यात येतं. त्यामुळे तुम्ही खूप अडचणीत येऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाणक्य नीतिमध्ये असं म्हटलं आहे की, जर कोणी तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर या सगळ्यात तिसऱ्या व्यक्तीला आणू नये. ही घटना तुमच्या आणि त्याच्यामध्ये राहू द्या. कारण जर तुम्ही ती इतरांना सांगितली तर इतर लोक तुम्हाला मदत करणार नाहीत तर तुमच्या अडचणीचा आनंद घेतील. तसेच ते तुमचा आदर करणार नाहीत. ज्या व्यक्तीसोबत अडचण आहे त्याच व्यक्तीशी बोललात तर उत्तम होईल. त्याला काय अडचण आहे? हे विचारा. अशा परिस्थितीत, तुम्ही त्याच्याशी चांगले संबंध ठेवू शकता आणि कदाचित ती व्यक्ती तुमचा पुन्हा अपमान करणार नाही.

आणखी वाचा : Chanakya Niti : वाईट काळ टाळायचा असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा! नेहमी यश मिळेल

चाणक्य नीतिमध्ये असेही सांगितले आहे की, जर तुम्ही कोणत्याही समस्येत अडकले असाल तर त्यावर उपाय स्वतः शोधा. कारण कोणताही माणूस त्याच्या फायद्याशिवाय कोणाचीही मदत करत नाही. लोक तुमच्याशी नक्कीच शांतपणे बोलतील. पण तुम्हाला मदत करणार नाहीत. शिवाय तुमच्यासमोर सहानुभूती दाखवून लोक तुमचा आनंद घेतील, हे तुम्हीही अनुभवले असेल. त्यामुळे तुमची समस्या तुम्हीच सोडवा.

आणखी वाचा : Chanakya Niti: या स्थितीत पत्नी आणि पैशांना जास्त महत्त्व देऊ नका! अन्यथा आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट गमावाल!

तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल, तर मी एखाद्याला सांगेन आणि तो मला मदत करेल, असा विचार करत बसू नका. कोणतीही व्यक्ती कोणत्याही लाभाशिवाय कोणाचीही मदत करत नाही आणि जर तुम्ही कोणाला सांगितले की तुमची आर्थिक परिस्थिती खराब आहे तर ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाईल. तसेच ते तुमचा आदर करणार नाहीत. त्यांना वाटेल की तुमच्याकडे पैसे तर नाहीत आणि त्यांचे तुमच्याशी चांगले संबंध आहेत म्हटल्यावर तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागाल. तुमची आर्थिक स्थिती खराब असेल तर तुम्ही स्वतः या समस्येला सामोरे जा. याबद्दल कुणाला सांगू नका.

आणखी वाचा : Chanakya Niti: चाणक्य नीतिमधल्या या गोष्टी लक्षात ठेवा, आयुष्यात कधीही संकटे येणार नाहीत

आचार्य चाणक्य म्हणतात की, तुमची कमजोरी कोणालाही न सांगता ती कमजोरी स्वतःकडे ठेवा. तुमच्या पत्नीला तुमच्या कमजोरीबद्दल सांगू नका. कारण तुमच्या पत्नीला तुमच्या कमकुवतपणाबद्दल समजले तर ती तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन पत्नी हवं ते करून घेतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की, चुकूनही तुमची कमजोरी तुमच्या पत्नीला आणि कोणत्याही व्यक्तीला सांगू नका.