Shukra Mangal Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एकाच राशीत तीन ग्रह एकत्र येत असतात तेव्हा त्यातून त्रिगही राजयोगाची निर्मिती होत असते. येत्या नववर्षाच्या सुरुवातीलाच शनीच्या स्वराशीत म्हणजेच कुंभेत शुक्र व मंगळ एकत्र येणार आहेत. शनी महाराज अगोदरच मार्गी स्थितीत कुंभ राशीत विराजमान असल्याने शनी- शुक्र- मंगळाची त्रिगही युती ही काही राशींच्या कुंडलीत महत्त्वाचे बदल घडवून आणू शकते. ज्योतिष शास्त्रात शुक्र हा वैभव, विलास, धन- धान्य व भौतिक सुखाचा प्रेमळ ग्रह म्हणून ओळखला जातो तर मंगळ हा तितकाच शूर- पराक्रमी, साहसी व आत्मविश्वासू हट्टी ग्रह म्हणून ओळखला जातो. शनिदेव हे तर कलियुगातील न्याय देवता आहेत. त्यामुळे तीन प्रभावित राशींना शनी महाराज कर्मानुसार शुक्र व मंगळाचा एकत्रित प्रभाव जाणवून देतील. पण या तीन राशी कोणत्या व त्यांना धनलाभ होणार असल्यास त्याचा स्रोत काय असू शकतो हे पाहूया..

शनी- शुक्र- मंगळ एकत्र येऊन कर्माचं फळ मिळणार, तुमची रास आहे का यात?

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

आपल्याला जरी मंगळाचा प्रभाव जाणवणार असला तरी यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाला उत्तम झळाळी मिळेल. तुम्ही तुमच्या स्वभावात बदल पाहाल. आत्मविश्वासाने बोलण्याची सवय लागेल ज्यामुळे आजवर झालेला अपमान किंवा संधी नाकारण्यासारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत. तुमची कामे एकार्थी मार्गी लगत असल्याने तुम्हाला त्यातूनच टप्प्याटप्प्याने प्रचंड मोठा धनलाभ होण्याची संधी आहे. विद्यार्थी वर्गाला कामाची गरज म्हणून एखादी नोकरी करावी लागू शकते पण अभ्यासातून दुर्लक्ष करू नये, येत्या काळात यश तुमच्या वाट्याला येण्याची चिन्हे आहेत त्यामुळे एकाग्रता हरपून त्याचा मार्ग अडवू नये. वाणीच्या प्रभावाने तुमचे समाजातील स्थान दृढ होऊ शकते.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mata Lakshmi's Blessings
२०२५ मध्ये या तीन राशींना मिळणार पैसाच पैसा! माता लक्ष्मीच्या कृपेमुळे सुटतील आर्थिक समस्या
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

कुंभ राशीत शनी व शुक्र एकत्र आल्याने मेष राशीच्या मंडळींना तर भव्य दिव्य प्रभाव जाणवून येऊ शकतो. ही युती तुमच्या राशीसाठी अत्यंत सकारात्मक ठरू शकते. अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज घडून येतील परिणामी तुम्ही ज्या गोष्टीला घाबरत होतात ती सुद्धा करून पाहाल. नोकरीच्या बाबत एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. गुंतवणुकीतून प्रचंड धनप्राप्ती होऊ शकते. शेअर मार्केटमध्ये पैसे अडकवणार असाल तर आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या पण असे केल्यास लाभाची चिन्हे आहेत. व्यापारी वर्गाचा नवीन लोकांशी संपर्क व संवाद होईल.

हे ही वाचा<< अजित पवारांच्या अडचणी का वाढतायत? ज्योतिषांनी मांडली कुंडली, भविष्यवाणी करत म्हणाले, “एप्रिल २०२४ पासून..”

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

शुक्र व मंगळ युती तुमच्या कर्मभावी तयार होत आहे. त्यातच शनीदेव हे कर्मदेवता म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमचं प्रत्येक काम हे तुम्हाला नेहमीपेक्षा दुप्पटीने प्रभाव देऊन जाऊ शकतो. एखाद्या मदत करण्याचे समाधान या कालावधीत अनुभवाल. नोकरी व व्यवसायात स्वतंत्र निर्णय घ्यावे लागतील इतरांचे मत ऐकूनही मनाचा कौल टाळू नका. तुम्हाला शनी व शुक्राची दहाव्या स्थानी घडत असणारी युती सुद्धा लाभदायक ठरू शकते. आपल्याला संतती सुखाची चिन्हे आहेत. विशेषतः मुलांच्या रूपात धनलाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader