Lucky Zodiac January 2024: ज्योतिषशास्त्रानुसार आजपासून सुरु होणाऱ्या नववर्षात अत्यंत महत्त्वाचे असे काही ग्रह बदल हे महिन्याच्या सुरुवातीलाच घडून येणार आहेत. अगदी वर्षाच्या पहिल्याच दिवसापासुन तीन राजयोग काही राशींच्या कुंडलीत सक्रिय असणार आहे. डिसेंबरच्या शेवटाकडे तयार झालेला लक्ष्मी नारायण योग व १ जानेवारीपासून जोर धरलेला बुधादित्य राजयोग काही राशींच्या नशिबाला कलाटणी देत त्यांना जानेवारी महिन्यात प्रचंड यश व संपत्तीचे धन बनवू शकतो. याचप्रमाणे सूर्य व मंगळ युतीने तयार झालेला आदित्य मंगल राजयोग व गुरु आणि चंद्राच्या एकत्र येण्याने बनलेला गजकेसरी योग सुद्धा या कालावधीत सक्रिय असणार आहे. वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार असा दुग्धशर्करा योग तब्बल ५० वर्षांनी जुळून आला आहे. त्यामुळे प्रभावित राशींना मिळणारा लाभ का द्विगुणित असू शकतो. नेमक्या या नशीबवान राशी कोणत्या व त्यांच्या भाग्यात कशाप्रकारे धनलाभ लिहिलेला आहे हे पाहूया..

जानेवारी मध्ये ५० वर्षांनी जुळला योग, ‘या’ पाच राशी ठरणार नशीबवान

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीच्या मंडळींसाठी जानेवारी हा आर्थिक लाभाचा महिना असणार आहे केवळ आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवून तुम्ही अनेक कामे मार्गी लावू शकता. जितका लाभ तितका खर्च असे काहीसे जानेवारी महिन्याचे समीकरण असेल. गुंतवणुकीवर भर द्या. यात्रेचे योग आहेत. जोडीदाराची मन राखायला सुरुवात करा कारण केवळ जानेवारी महिन्यातच नव्हे या संपूर्ण वर्षासाठी तुम्हाला जोडीदाराची साथ अत्यंत आवश्यक असणार आहे. प्रेमाची नाती तुमच्या आयुष्यातील गोडवा वाढवतील पण तुम्हाला उत्साहाने इतरांना जपावे लागेल. तुमचे संपर्क व नातीच धनलाभाचे माध्यम ठरणार आहे.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

कर्क राशीच्या मंडळींना २०२४ चा जानेवारी महिना ऊन सावलीचा कालावधी घेऊन येणार आहे. तुम्ही कामात पूर्णपणे गुंतून जाल, यामुळे दमछाक सुद्धा होऊ शकते पण यामुळे तुम्हाला मिळणारा मोबदला व समाधान अत्यंत महत्त्वाचे ठरेल. नोकरदार मंडळींना वरिष्ठांची साथ लाभेल, कुटुंबाकडे काहीसे दुर्लक्ष होऊ शकते पण महिन्याच्या सरतेशेवटी एखाद्या प्रवासाच्या निमित्ताने तुम्ही ही उणीव भरून काढाल.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सिंह राशीच्या मंडळींना २०२४ च्या जानेवारी महिन्यात अत्यंत समजूतदारीने वागावे लागेल. तुम्हाला चिडचिड करून चालणार नाही. धीर व संयमाने कामे पूर्ण केल्यास या महिन्यात लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला लाभण्याची शक्यता आहे. अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असाल तर हा कालावधी शुभ ठरू शकतो.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

कन्या राशीच्या मंडळींना जानेवारी महिन्यात नवीन लोकांसह नाती जोडता येतील. समाजातील तुमचा मान- सन्मान व महत्त्व वाढवणारी एखादी घटना घडू शकते. जुने कौटुंबिक वाद मार्गी लागू शकतील. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. तुमची आर्थिक मिळकत गुंतवणुकीच्या मार्गातून वाढू शकते. पदोन्नत्तीचे संकेत कुंडलीत दिसत आहेत.

हे ही वाचा<< १ जानेवारी पंचाग: २०२४ चा पहिला दिवस मेष ते मीन राशीसाठी कोणती गोड बातमी घेऊन आलाय? तुमची रास काय सांगते

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

कुंभ राशीत आता शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होत असल्याने प्रगतीवर प्रभाव दिसून येऊ शकतो. शनी आपल्या राशीचे स्वामी असल्याने आपल्याला शनीची साडेसाती सुद्धा भाग्यदायी ठरू शकते. या कालावधीत प्रभावशाली व्यक्तिमत्वांशी ओळख होऊन तुमच्याही व्यक्तिमत्वात त्याचा मोठा प्रभाव दिसून येऊ शकतो. जोडीदाराला भेटवस्तू देण्याची संधी मिळू शकते. उत्साह व ऊर्जा टिकवून ठेवताना संयम हरवू देऊ नका. नवीन वर्षात मानसिक शांतीसाठी प्रयत्न करता येतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader