Solar Eclipse 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ८ एप्रिलला मीन राशीत चार ग्रह मिळून चतुर्ग्रही योग निर्माण करणार आहेत. या दिवशी २०२४ या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुद्धा लागणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चतुर्ग्रही योगासह सूर्यग्रहणाचा योगायोग्य हा अत्यंत दुर्मिळ असून तब्बल ५०० वर्षांनी अशी ग्रह रचना जुळून येत आहे. मीन राशीत यादिवशी सूर्य, बुध, राहू, शुक्र मिळून चतुर्ग्रही राजयोग बनवणार आहेत. सूर्य ग्रहणाच्या दिवशी चतुर्ग्रही योग बनल्याने १२ राशींवर त्यांचा प्रभाव असणार आहेच पण चार अशा राशी आहेत ज्यांच्यावरील प्रभाव हा अत्यंत शुभ व लाभदायक असणार आहे. यादिवशी या राशींना आपल्याकडील धन- धान्य, सुख- शांती द्विगुणित झाल्याचे लक्षात येईल, आपण प्रगतीच्या पथावर काही पाऊले पुढे जाऊ शकाल. ८ एप्रिलपासून ज्यांचे अच्छे दिन सुरु होणार आहेत अशा नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्य ग्रहणासह चतुर्ग्रही योग, ‘या’ राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष राशीच्या मंडळींना सूर्य ग्रहण व चतुर्ग्रही योग अत्यंत लाभदायक असणार आहे. आपल्याला अनपेक्षित व अचानक असा धनलाभ होऊ शकतो. व्यायवसायात गती लाभेल. विशेष लाभ होऊ शकतात. सरकारी योजनांचे फायदे मिळू शकतात. भांडवलाची चिंता मिटण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना सुद्धा उत्तम काम मिळू शकते. तर नोकरदारांना पगारवाढीचा लाभ होऊ शकतो.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण वृषभ राशीसाठी फायदेशीर असणार आहे. या कालावधीत आपल्याला शुभ फळ प्राप्त होऊन मेहनत सार्थकी लागल्याचे वाटेल. मुलाखत किंवा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. नव्या सुरुवातीच्या दिशेने काही पाऊले पुढे जाल. एखाद्या प्रॉपर्टीच्या व्यवहारात अचानक मोठा फायदा होऊ शकतो. वाहन सुख लाभू शकते. आर्थिक फायदे झाल्याने तुमच्या मानसिक आरोग्याला सुद्धा थोडी शांतता अनुभवता येऊ शकते. वैवाहिक आयुष्य सुखकर होईल.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सिंह राशीवर सूर्य ग्रहण हे अत्यंत शुभ प्रभाव टाकणार आहे. सिंह राशीसाठी अनुकूल असे बदल घडून येऊ लागतील. आपल्या आर्थिक मिळकतीत वाढीचे संकेत आहेत. एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक सौख्य लाभेल. अडकून पडलेले पैसे परत येतील. नवीन घर, गाडी खरेदीचा योग आहे.

हे ही वाचा<< “उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

धनु राशीसाठी सूर्यग्रहण व मीन राशीत एकत्र आलेले चार ग्रह अनुकूल फलप्राप्ती मिळवून देतील. आपली आर्थिक स्थिती वेगाने सुधारण्याची शक्यता आहे. आर्थिक मिळकतीच्या कक्षा व स्रोत बळकट होतील. तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी प्राप्त होऊ शकते. ठरवलेले प्लॅन्स पूर्ण होतील. नवीन संपर्क जोडले जातील ज्यांच्या माध्यमातून भविष्यातील अनेक कामे पूर्ण होण्यासाठी मदत होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 500 years later surya grahan collides with rarest chaturgrahi yog achhe din of these four rashi to begin from 8 april money showers svs