5th September Rashi Bhavishya & Panchang : आज ५ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असणार आहे. द्वितीया तिथी दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर तृतीया तिथी सुरू होईल. गुरुवारी ९ वाजून ८ मिनिटांपर्यंत शुभ योग राहील. तसेच आज हस्त नक्षत्र जागृत असणार आहे. आजचा अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर आज राहू काळ दुपारी १ वाजता सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. दिनविशेष सांगायचे झाल्यास आज शिक्षक दिन सुद्धा असणार आहे. तर आज मेष ते मीन पैकी कोणत्या राशीवर स्वामींची कृपा असणार आहे हे आपण जाणून घेऊ या…

०५ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य :

मेष:- जोडीदाराच्या सहकार्याने काम पूर्ण कराल. घरातील मोठ्या कामाला गती येईल. मुलांची कृती मनाला लागू शकते. इच्छा नसताना एखादे काम करावे लागेल. मन विचलीत होऊ शकते.

saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Mesh To Meen Zodiac signs Daily Horoscope In Marathi
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?
Ketu mangal yuti 2025 today horoscope
Ketu Mangal Yuti 2025 : जूनमध्ये खुलणार ‘या’ राशींचे भाग्य; केतू-मंगळाच्या युतीने मिळणार भरपूर पैसा अन् संपत्ती
surya guru gochar 2025 sun jupiter make kendra drishti yog these zodiac sign will be lucky
होळीच्या आधी ‘या’ तीन राशींची होईल चांदी! सूर्य-गुरू निर्माण करणार केंद्र योग, प्रत्येक कामात मिळणार यश
mahakumbh 2025
आज महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान! बुधादित्य योगामुळे ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय, करिअर -व्यवसायात मिळेल भरपूर यश
2nd February 2025 Rashi Bhavishya
२ फेब्रुवारी पंचांग: सरस्वतीच्या कृपेने कोणाच्या घरात येईल यश आणि प्रसिद्धी? रविवारी तुमच्या राशीची होणार का इच्छापूर्ती?
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण

वृषभ:- विकतची दुखणी घेऊ नका. विचार करून निर्णय घ्या. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. उगाच नसते विचार करू नका. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

मिथुन:- इतरांचा विश्वास संपादन करावा. दिवसाची सुरुवात उत्तम होईल. प्रयत्नात कसूर करू नका. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. सावधगिरी बाळगून कामे करावीत.

कर्क:- छानशौकीपणावर खर्च कराल. खर्चावर ताबा ठेवावा. संयम आणि धिराने परिस्थिती हाताळा. दिवसाची सुरुवात मध्यम फलदायी असेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह:- लोकांना योग्य सल्ला द्याल. जबाबदारीने काम कराल. उद्योगाची स्थिती सुधारेल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. हितशत्रू माघार घेतील.

कन्या:- आक्रमकतेने बोलू नका. व्यापारी क्षेत्रात प्रगती कराल. आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. मदतीचा हात पुढे कराल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

तूळ:- भागीदारीत सबुरीने घ्यावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. स्पर्धा परीक्षेची तयारी कराल. हिशोबात चोख राहाल. अनेक दिवस वाट पाहत असलेल्या व्यक्तीची गाठ पडेल.

वृश्चिक:- जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. मित्रांचा सल्ला ऐकावा. मेहनतीचे कौतुक केले जाईल. कामावर लक्ष केन्द्रित करणे गरजेचे. एकूणच आजचा दिवस संमिश्र राहील.

धनू:- रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मनातील अनामिक भीती दूर होईल. दुपारनंतर धावपळ करावी लागेल. नवीन ओळख मैत्रीत बदलेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

मकर:- विचारांना चांगली दिशा द्याल. मनात नवीन कल्पना रुजतील. कामे विलंबाने सुरू करू नका. चिकाटी व संयम कायम ठेवा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कुंभ:- मनातील संभ्रम दूर करावा. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते.

मीन:- कौटुंबिक समतोल साधावा. भागीदारीच्या कामात अधिक वेळ द्यावा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जुने कामे आधी पूर्णत्वास न्या. मन विचलीत होणार नाही याची दक्षता घ्या.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader