Surya Dev Mahagochar In Kanya Rashi: सप्टेंबर महिन्याला गणपती बाप्पांचे आगमन, श्रावण यामुळे यंदा पवित्र महिन्याचे महत्त्व प्राप्त झाले आहे. योगायोगाने या महिन्यात अनेक महत्त्वाच्या ग्रहांचे गोचर सुद्धा होणार आहे. ग्रहांचे राजे म्हणून ओळखले जाणारे सूर्य देव यंदा तब्बल ३६५ दिवसांनी कन्या राशीत महागोचर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. १७ सप्टेंबर म्हणजेच शेवटच्या श्रावणी सोमवार नंतर ६ दिवसांनी दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी सूर्यदेव कन्या आहेत. १८ ऑक्टोबर पर्यंत सूर्य कन्या राशीत विराजमान असतील व त्यानंतर तूळ राशीत प्रवेश घेईल.

असं म्हणतात सूर्य हा प्रभावशाली ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या हालचालींमुळे राशीचक्रावर सुद्धा परिणाम साहजिकच होत असतो. याही वेळेस सूर्याचे गोचर होताच १२ राशींचे नशीब कमी अधिक प्रमाणात बदलणार आहेच पण त्यातही तीन अशा राशी आहेत ज्यांना प्रत्यक्ष शिवपार्वतीची कृपा लाभू शकते. या भाग्यवान राशींना नेमका कसा लाभ होणार आहे हे पाहूया ..

Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Gajakesari Raja Yoga
१३ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा; गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने आयुष्यात येणार धनसंपत्तीचे सुख
navpancham yog in kundali
शुक्र-गुरू बनवणार नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख
Venus and Rahu yuti in meen rashi
शुक्र आणि राहू देणार बक्कळ पैसा; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार

धनु राशि (Sagittarius Rashi Bhavishya)

सूर्य गोचराचा सर्वाधिक लाभ धनु या राशीला होणार आहे. सूर्याच्या गोचरामुळे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी मिळू शकते. या काळात विद्यार्थ्यांना प्रचंड फायदा होण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचा मान- सन्मान वाढण्याचे योग आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही ज्या गोष्टींपासून स्वतःला थांबवत होतात त्याच करण्याचे बळ प्राप्त होईल आणि आश्चर्याची बाब म्हणजे यामधून तुम्हाला प्रचंड मोठा आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो. धनु राशीला बुद्धीच्या जोरावर माणसांना आकर्षित करता येईल.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

स्वतः सूर्यदेव आपल्या राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे सूर्यदेव कोणत्याही राशीत असले तरी तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी कायमच असते. तुमचे ग्रहमान सध्या अत्यंत बळकट आहे. त्यात सूर्याच्या प्रभावामुळे तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. नशिबाची तगडी साथ लाभल्याने, तुमचे अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला सोन्याच्या गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो.

हे ही वाचा<< १७ सप्टेंबरपर्यंत ‘या’ राशींच्या कुंडलीत पैशाचा पाऊस? श्रावणाचा शेवटचा आठवडा कसा असेल? वाचा १२ राशींचे भविष्य

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

सूर्य देवाच्या राशी परिवर्तनामुळे आपल्याला जुन्या आजारातून मुक्ती मिळू शकते. आरोग्यात सुधारणा झाल्याने तुम्हाला वेगळा उत्साह ऊर्जा मिळू शकते. मागील काही काळात आपली गती हरवली असल्यास समाजातील आपले स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी हा कालावधी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचा आदर केला जाईल. आर्थिक कक्षा रुंदावल्याने तन- मन- धनाची प्राप्ती होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader