6 Planets Align in March : या आठवड्यात सूर्य ग्रहणाचा प्रभाव दिसून येईल. भारतात सूर्य ग्रहण दिसणार नाही पण याचा कमी प्रमाणात का असो पण प्रभाव दिसून येईल. ग्रहाच्या प्रभावाने काही राशींना जबरदस्त आर्थिक लाभ आणि त्यांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. या संयोगाच्या प्रभावाने आंतरराष्ट्रीय व्यवसाय, गुंतवणूक आणि शेअर बाजारात चढ उतार पाहायला मिळेल. जाणून घेऊ या दुर्लभ ग्रहाचा योगामुळे कोणत्या राशींच्या जीवनात प्रभाव दिसून येईल.
६ ग्रहाच्या संयोगाने दिसून येईल प्रभाव
वृषभ राशि:
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा ग्रह संयोग एकादश भावात निर्माण होत आहे, जो लाभ, मान सन्मान, आणि पराक्रमाचा भाव आहे. हा संयोगाचा परिणाम वृषभ राशींच्या लोकांवर दिसून येईल. या राशीच्या लोकांना धनलाभाचे प्रबळ योग दिसून येईल. सूर्य, शनि, राहु, बुध, शुक्र आणि चंद्राच्या प्रभावाने वृषभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ मिळू शकतो. अडकलेला पैसा परत मिळू शकतो आणि नवीन पैसा कमावण्याचे स्त्रोत मिळू शकतात.
करियरमध्ये प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याचे योग निर्माण होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. विरोधकांवर विजय मिळवू शकाल. कोणत्याही वादविवाद किंवा स्पर्धा परिक्षेत यश मिळू शकते. कौटुंबिक मतभेद दिसून येईल. या लोकांना आर्थिक प्रगती दिसून येईल. वडील किंवा वरिष्ठ सदस्यांपासून वैचारिक मतभेद होऊ शकते.
आरोग्य उत्तम राहीन. जुन्या आजारातून सुटका मिळेल. ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहीन. नवीन गुंतवणूक करायला संधी मिळेल. या दरम्यान गुंतवणूक करण्यासाठी शुभ योग मिळणार. रिअल इस्टेट किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळू शकतो.
तुळ राशी
तुळ राशीच्या लोकांसाठी हा ग्रह संयोग सहाव्या भावात निर्माण होणार आहे, जो ऋण, रोग आणि शत्रू भाव आहे. ग्रहांचा हा प्रभाव तुळ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना कर्जापासून सुटका होईल. उसने घेतलेला पैसा किंवा धन परत मिळण्यात यश मिळू शकते.
न्यायालयीन प्रकरणात या लोकांना यश मिळू शकते. निर्णय या लोकांच्या बाजूने येईल. या लोकांची आर्थिक प्रगती होईल. व्यवसायात जबरदस्त फायदा होऊ शकतो. नवीन गुंतवणूकीत धनलाभ होण्याची शक्यता आहे. विरोधकांवर विजय मिळेल. प्रतिस्पर्धकांना चांगली टक्कर द्याल. आरोग्यामध्ये सुधारणा दिसून येईल. जुन्या आजारांपासून सुटका होईल. मानसिक तणाव कमी होईल. आर्थिक योजनांमध्ये यश मिळेल. तुळ राशीचे लोक या दरम्यान नवीन योजनांची सुरुवात करू शकतात जे दीर्घ काळानंतर यशस्वी होईल.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी हा ग्रह संयोग तृतीय भावात निर्माण होईल, जो धाडस आणि पराक्रमाचा भाव आहे. हा संयोग मकर राशीच्या लोकांसाठी अतिशय फायद्याचा ठरू शकतो. ग्रहाची दृष्टी नवव्या भावात दिसून येईल ज्यामुळे या लोकांचे भाग्य चमकू शकते. अडकलेले कामे पूर्ण होतील.
या लोकांना राजकारणात यश मिळू शकते. मोठ्या पद प्राप्तीचे योग जुळून येत आहे. या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसायात नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना पगारात वृद्धी होऊ शकते. शत्रुंवर विजय मिळवण्यात यश येईल. कायदेशीर प्रकरणात यश मिळेल. कौटुंबिक मतभेद दूर होईल. लहान बहीण भावांबरोबर वादविवाद होऊ शकतो. व्यवसायात यश मिळू शकते. मकर राशीच्या लोकांना व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. विदेशी व्यवसायात लाभ मिळू शकतो.