6th February 2024 Marathi Horoscope: आज, ६ फेब्रुवारी २०२४ ला षटतिला एकादशी असणार आहे. या एकादशीला केलेल्या व्रताचे शुभ फळ धन- धान्याच्या स्वरूपात प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा असते. या दिवशी राशीचक्रातील कोणत्या राशीला कसे लाभ मिळण्याची शक्यता आहे हे आता आपण पाहणार आहोत. वाचा मेष ते मीन राशीचे भविष्य.

मेष:-कामातून समाधान शोधाल. जवळचे नातेवाईक भेटतील. प्रेमविवाहात सबुरीने घ्यावे. वारसाहक्काची कामे निघतील. जुनी येणी वसूल होतील.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mata Lakshmi's Blessings
२०२५ मध्ये या तीन राशींना मिळणार पैसाच पैसा! माता लक्ष्मीच्या कृपेमुळे सुटतील आर्थिक समस्या
Triekadash Yogo 2025
२०२५मध्ये शनी-बुध निर्माण करेल त्रिएकादश योग! या राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ, होणार धनलाभ
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश

वृषभ:-प्रवासातील अडचणी दूर कराव्यात. घरासाठी दगदग वाढेल. सकारात्मक विचारांनी वाटचाल करावी. मोठ्या लोकांची गाठ पडेल. अंगीभूत कला सादर करता येईल.

मिथुन:-आशावादी दृष्टिकोन ठेवावा. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. परोपकाराची जाणीव ठेवाल. मनात नसते मांडे रचू नका. घरात नातेवाईक गोळा होतील.

कर्क:-प्रेमात फसवणुकीची शक्यता. वरिष्ठांच्या जास्त पुढे करू नका. धोरणीपणाने वागाल. नातेवाईकांकडून विरोध होवू शकतो. प्रलोभनात वाहवत जाऊ नये.

सिंह:-आवडीचे पदार्थ चाखाल. मुलांना योग्य प्रशिक्षण घेता येईल. अकारण ताणतणावाला बळी पडू नका. आरोग्यात सुधारणा होईल. जबाबदारीत वाढ होईल.

कन्या:-आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहनांवरील वेग नियंत्रित ठेवावा. हाताखालील लोकांचे प्रश्न नीट हाताळावेत.

तूळ:-घरातील कुरबुरी दूर कराव्यात. जोडीदाराची प्रगती होईल. स्थावर संबंधीचे प्रश्न सोडवावेत. आधुनिक विचारांची जोड घ्यावी. सरकारी योजनेचा लाभ घ्यावा.

वृश्चिक:-आततायीपणे वागू नये. क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नयेत. आत्मविश्वासाने वाटचाल करता येईल. रखडलेली कामे उरकून घ्यावीत. कौटुंबिक बाबतीत दिलासा मिळेल.

धनू:-आर्थिक व्यवहार सबुरीने करावेत. नवीन दृष्टिकोन ठेवावा. सामाजिक बाबीत फार लक्ष घालू नका. सहलीचे आयोजन कराल. लोकोपयोगी कामे कराल.

मकर:-मानसिक त्रास काहीसा वाढू शकतो. कामाच्या वेळा सांभाळाव्यात. गप्पागोष्टींमध्ये वेळ घालवाल. चित्त चांचल्य जाणवेल. अडथळ्यातून मार्ग काढाल.

कुंभ:-झोपेची तक्रार जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. मनात उगाचच चिंता लागून राहील. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. निराशा दूर सारावी.

हे ही वाचा << ३३१ दिवस ‘या’ राशींवर शनिदेव असणार मेहेरबान; कर्म बदलल्यास लाभेल अपार पैसा, बघा तुम्हाला आहे का ही संधी?

मीन:-अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. थोरांच्या सहवासात लाभेल. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. व्यावसायिक वाढीचा विचार करावा. कामाच्या ठिकाणी मान वाढेल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader