6th July Ashadh Prarambh Panchang & Rashi Bhavishya: ६ जुलै २०२४ ला आज आषाढ महिन्याचा प्रारंभ होत आहे. शनिवारचा पूर्ण दिवस व रात्र पार करून पहाटे ४ वाजून २७ मिनिटांपर्यंत आषाढ शुक्ल प्रतिपदा असणार आहे. आजचा पूर्ण दिवस व उद्याच्या पहाटे ४ वाजून २७ मिनिटांपर्यंत यायीजयद योग सुद्धा कायम असणार आहे. उद्या पहाटे ४ वाजून ४८ मिनिटांपर्यंत पुनर्वसू नक्षत्र सुद्धा जागृत राहील. आजच पहाटे ४ वाजून ३१ मिनिटांनी कर्क राशीत शुक्राने प्रवेश केला आहे. या ग्रहस्थितीनुसार तसेच योगांनुसार आजचा आषाढ महिन्यातील पहिला दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

६ जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:-जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे. संयमाने परिस्थिती हाताळा. कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवा. काही बदल त्रस्त करू शकतात. संयमाने वागावे.

वृषभ:-आर्थिक आवक वाढेल. महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. सवयी बदलाव्या लागतील. मेहनतीला पर्याय नाही. यश विलंबाने पदरात पडेल.

मिथुन:-आवास्तव खरेदीचा मोह टाळायला हवा. आज प्रेमाची अनुभूति येईल. मनाची दोलायमानता सांभाळावी लागेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. नकारात्मक विचार सोडून द्यावेत.

कर्क:-मनाची चंचलता आवरावी. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. वरिष्ठांना नाराज करू नका. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उगाच लपवाछपवी करू नका.

सिंह:-तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. अथक मेहनतीचे चांगले फळ मिळेल. अनुभावातून धडा घ्यावा. मस्करीची कुस्करी होऊ देऊ नका. धार्मिक अनुष्ठानात दिवस घालवावा.

कन्या:-सामाजिक बांधीलकी जपावी. तुमच्याकडील कलेचे कौतुक केले जाईल. नातेवाईकांना सांभाळावे लागेल. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ:-गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येऊ शकतात. वादामुळे मन खिन्न होऊ शकते. इतरांवर विसंबून राहू नका.

वृश्चिक:-मुलांशी वाद होऊ शकतो. भावनिक घटना घडू शकतात. कोणताही निर्णय घेताना सावध राहावे. घाईगडबड टाळावी. अचानक धनलाभाची शक्यता.

धनू:-घरातील वातावरण संमिश्र राहील. नवीन ओळखी वाढतील. जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. व्यावसायिक क्षेत्रातून लाभ होईल. भागिदारीतून नफा कमवाल.

मकर:-कामासाठी बाहेर राहावे लागेल. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. घराबाहेर बेसावधपणे वागू नये. कामाचा बोजा वाढू शकतो. समस्येतून मार्ग निघेल.

कुंभ:-सामाजिक कामात सहभाग घेऊ नका. दगदग व धावपळ टाळावी. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मुलांमुळे घर खेळकर राहील. करमणुकीवर भर द्यावा.

हे ही वाचा<< शनी राहूच्या जोडीमुळे २०२५ पर्यंत तब्बल ८ राशी होणार अपार श्रीमंत; बघता बघता बदलेल आयुष्य, कुंडलीत कसे येतील अच्छे दिन?

मीन:-जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. मनातील गैरसमज दूर होतील. आर्थिक चिंता मिटेल. मन प्रसन्न राहील. प्रलोभनापासून दूर राहावे.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर