7th July Panchang & Rashi Bhavishya Marathi: ७ जुलै २०२४ ला आषाढ महिन्यातील द्वितीया तिथी आहे. रविवारच्या दिवशी पूर्ण दिवसभर व रात्र पार सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत द्वितीया तिथी कायम असणार आहे. ७ जुलैच्या रात्री २ वाजून १४ मिनिटांपर्यंत हर्षण योग कायम असणार आहे. रविवारच्या दिवशी पूर्ण रात्र पार करून सोमवारी शकलो ६ वाजून ४ मिनिटांपर्यंत पुष्य नक्षत्र योग असणार आहे. आजपासून जगन्नाथपुरी येथे रथोत्सव देखील सुरु होणार आहे. आजच्या रविवारी मेष ते मीन राशीच्या नशिबात काय लिहून ठेवलंय हे पाहूया..

७ जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:-राजकीय भूमिकेला यश येईल. तुमचा उत्साह वाढीस लागेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. अति घाई चांगली नाही.

Shani Nakshatra Parivartan 2024
दिवाळीआधी शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींच्या धन-संपत्तीत होणार वाढ
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार प्रचंड लाभ; वाचा सूर्याच्या हस्त नक्षत्रात प्रवेशाने तुमच्या कुंडलीत काय बदल होणार
Surya transit in libra
नवरात्रीनंतर पैसाच पैसा! सूर्याच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार यश, मानसन्मान आणि भौतिक सुख
Budh gochar 2024 Libra will bring joy and happiness
आकस्मिक धनलाभ होणार; तूळ राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
After Diwali Jupiter will change Nakshatra
देवी लक्ष्मी देणार बक्कळ पैसा! दिवाळीनंतर गुरू करणार नक्षत्र परिवर्तन; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींची होणार भरभराट
Surya-Ketu yuti these three zodic sign
सूर्य-केतूची युती देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
Guru gochar 2024 these two zodiac signs will get a new job
आता पैसाच पैसा; आठ दिवसांनंतर गुरू ग्रहाच्या प्रभावाने ‘या’ दोन राशींच्या व्यक्तींना मिळणार नवी नोकरी अन् मानसन्मान

वृषभ:-सामाजिक भान राखावे लागेल. तरुण वर्गाला आशादायक संधी मिळतील. मित्रांच्या सहवासात रमून जाल. भावंडांचे अधिक प्रेम मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मिथुन:-मुलांसाठी लाभदायक गोष्टी घडतील. प्रत्येक गोष्टीत गोडी वाटेल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. मित्रांशी वाद घालू नयेत. जमिनीच्या कामातून लाभ होऊ शकतो.

कर्क:-मानसिक चंचलता जाणवेल. बोलताना भान राखावे. अघळ-पघळ गोष्टी बोलू नका. अनाठायी खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील.

सिंह:-मनोवांच्छित लाभेल. नवीन काम सुखावणारे असेल. मानसिक चांचल्य राहील. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. मित्रांची उत्तम साथ लाभेल.

कन्या:-तरुण वर्गाचे विचार जाणून घ्याल. काही नवीन ओळखी होतील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमचा दर्जा सुधारला जाईल. झोपेची तक्रार जाणवू शकते.

तूळ:-नवीन कामात गढून जाल. अधिकारी लोकांशी भेटता येईल. गोड बोलण्यातून लोक संग्रह वाढेल. कमिशन मधून लाभ मिळवाल. पत्नीचा वरचष्मा राहील.

वृश्चिक:-उगाच टोकाची भूमिका घेऊ नका. वाढीव मेहनत करावी लागू शकते. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो. भावंडांशी वाद घालू नका. गुंतवणुकीच्या योजना सावधपणे कराव्यात.

धनू:-अचानक धनलाभ संभवतो. काही कामे कमी कष्टात पार पडतील. कथित गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. आध्यात्मिक आवड वाढेल. पित्त विकार वाढू शकतात.

मकर:-प्रशंसेचा दिवस. भावनिक वळणे येऊ शकतात. दांपत्य जीवन सुखकारक राहील. कामात सुलभता येईल. शेजार्‍यांचा त्रास होण्याची शक्यता.

कुंभ:-मौजमजा कराल. स्वत:ला नियमात बांधू नका. जोडीदाराची प्रगती होईल. नवीन कामात उत्साह जाणवेल. कार्यक्षेत्रात मान, सन्मानाचे योग येतील.

हे ही वाचा<< शनी राहूच्या जोडीमुळे २०२५ पर्यंत तब्बल ८ राशी होणार अपार श्रीमंत; बघता बघता बदलेल आयुष्य, कुंडलीत कसे येतील अच्छे दिन?

मीन:-सुसंवादातून लाभ होतील. घरातील कामात मन गुंतवाल. विरोधक शांत राहतील. महत्वाकांक्षी योजना आमलात आणाव्यात. परिश्रमाची कास सोडू नये.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर