7th June Panchang & Rashi Bhavishya Marathi: ७ जून २०२४ ला ज्येष्ठ शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनंतर प्रतिपदा तिथी असणार आहे. ७ जून संध्याकाळी ७ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मृगशिरा नक्षत्र जागृत असणार आहे. आज संध्याकाळी ८ वाजून ५ मिनिटांपर्यंत शूल योग असणार आहे. सूर्य व चंद्र वृषभ राशीत असणार आहे. आजच्या दिवशी ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. सकाळी १० वाजून ३६ मिनिटांपासून ते १२ वाजून २० मिनिटांपर्यंत राहू काळ असणार आहे. आजच्या दिवशी कोणत्या राशीच्या कुंडलीत कोणते बदल अपेक्षित आहेत हे पाहूया..

७ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-कामानिमित्त संपर्कात वाढ होईल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. वडीलधार्‍यांचा सल्ला विचारात घ्यावा. आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न कराल. मित्रांशी वाद वाढवू नका.

Surya Grahan 2024 on Sarva Pitru Amavasya: Do We Worship Our Ancestors
Surya Grahan on Sarva Pitru Amavasya : सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण आल्याने पितरांची पुजा करावी की नाही? जाणून घ्या
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Sarva Pitru Amavasya 2024
Sarva Pitru Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहणाचे सावट; या दिवशी सुतक काळ पाळावे की नाही? जाणून घ्या
Surya-Ketu yuti these three zodic sign
सूर्य-केतूची युती देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
Anant Chaturdashi | a rare Sanyog brings good fortune to four lucky zodiac signs
Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी निर्माण होणार दुर्मिळ संयोग; ‘या’ चार राशींचे नशीब चमकणार, बाप्पाच्या आशीर्वादाने येईल चांगले दिवस
shukra gochar 2024 after 4 days Venus enter in Libra
४ दिवसांनंतर नुसता पैसा; शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
Surya nakshatra parivartan 2024
३० सप्टेंबरपासून पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
Shukra Nakshatra Gochar 2024
१३ सप्टेंबरपासून पालटणार ‘या’ तीन राशीधारकांचे नशीब, शुक्र नक्षत्रामुळे अपार धनलाभ

वृषभ:-सर्व बाबतीत आनंद मानाल. व्यावसायिक आघाडीवर महत्त्वाची कामे कराल. नोकरदारांची जबाबदारी वाढेल. आर्थिक मान सुधारेल. मानसिक अस्वस्थता वाढवू नका.

मिथुन:-हाती घेतलेल्या कामात पूर्तता येईल. कामाचा फार ताण घेऊ नका. बोलतांना वाणीवर संयम ठेवावा लागेल. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कर्क:-फसवणुकीपासून सावध राहावे. व्यवसायिकांना चांगला आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक खर्च अचानक वाढू शकतो. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. मनातील निराशा दूर सारावी.

सिंह:-प्रत्येक कृती संयमाने करावी. वादापासून चार हात दूर राहावे. घरातील ज्येष्ठाशी मतभेद संभवतात. कागदपत्रांवर सही करतांना दक्षता बाळगा. लबाड लोकांपासून वेळीच दूर रहा.

कन्या:-अचानक धनलाभाची शक्यता. परोपकाराच्या जाणि‍वेतून कामे कराल. पोटाच्या तक्रारी राहतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जास्त संवेदनशील होऊ नका.

तूळ:-द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेताना कठीण होईल. काही महत्त्वाची कामे पार पडतील. व्यवहारात फार हटवादीपणा करू नका. क्रोधामुळे वाद वाढू शकतात. दिवसभरात चांगली आर्थिक कमाई होईल.

वृश्चिक:-मानसिक प्रसन्नता लाभेल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. जवळच्या ठिकाणच्या सहलीचे आयोजन कराल. जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक शांतता जपावी.

धनू:-प्रत्येक कृती संयमाने करावी. मानसिक चिंता दूर साराव्यात. मुलांचा खोडकरपणा वाढीस लागेल. जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात. प्रवास जपून करावा.

मकर:-जवळच्या मित्रांशी भेट होईल. कामे मनाजोगी पार पडतील. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. प्रेमप्रकरणात नवीन आशा पल्लवीत होईल. अचानक धनलाभाची शक्यता.

कुंभ:-व्यावसायिक ठिकाणी कामाचे कौतुक होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद संभवतात. जवळच्या ठिकाणी सहलीचा आनंद घ्याल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमा कराल.

हे ही वाचा<< “२०२७ पर्यंत पुन्हा..”, उद्धव ठाकरेंसाठी मोठी भविष्यवाणी; कुंडलीतील बदलाचं लोकसभेच्या निकालातील प्रतिबिंब पाहा

मीन:-वरिष्ठांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. मानसिक चिंता बाजूला साराव्यात. कौटुंबिक वातावरण तुमच्या आवडीचे राहील. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. शारीरिक कंटाळा झटकून टाकावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर