Rahu-Mercury Conjunction in Pisces : राहू- केतू हे मंदगतीने (वक्रगतीने) मार्गक्रमण करणारे ग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर चांगले वाईट परिणाम करीत असतात. मागील वर्षी म्हणजेच २८ ऑक्टोबर २०२३ ला राहूने गोचर करून मीन राशीत प्रवेश घेतला होता. आणि आता ७ मार्चला बुध ग्रह सुद्धा मीन राशीत गोचर करणार आहे. यामुळे अत्यंत दुर्लभ अशी राहू व बुध युती निर्माण होत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ही युती ही तब्बल १८ वर्षांनी तयार होत आहे. यातून एक दोन नव्हे तर तब्बल पाच राशींना प्रचंड मोठा लाभ होण्याची चिन्हे आहेत. ता राशींना कौटुंबिक सुखापासून ते व्यवयसायिक लाभांपर्यंत अनेक फायदे होऊ शकतात. जर आपली प्रत्येक चाल विचारपूर्वक ठरवली तर ७ मार्च पासून पुढील कालावधी आपल्याला कोट्याधीश होण्याची संधी देऊन जाऊ शकतो. ही संधी नेमक्या कोणत्या राशीच्या कुंडलीत आहे हे जाणून घेऊया..

७ मार्चपासून ‘या’ पाच राहू बुधाच्या कृपेने होऊ शकतात कोट्याधीश?

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ ही शुक्राची राशी त्या राशीच्या लाभस्थानात राहूचे वास्तव्य खूपच शुभदायक ठरेल. सामाजिक क्षेत्रात, राजकारणात हा राहू यशदायक ठरेल. तर नवीन परिचय, नवीन ओळखीतून उद्योगधंद्यात नोकरीत नव्या योजना आखल्या जातील. एकूण नातेवाईक मित्रमंडळींचा सहवास आनंदी उत्साही ठरेल. या राशीच्या करिअरला वेग प्राप्त होऊ शकतो. ज्या गोष्टींना आजवर उगाच विलंब होत होता त्या गोष्टी जुळून येऊ शकतात. यामुळे आपल्या कामाचे कौतुक तर होईलच पण आपला बँक बॅलन्स वाढण्यास याची मोठी मदत होऊ शकते. ताण- तणाव दूर होईल. कौटुंबिक सुख लाभेल.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

कर्क राशीच्या भाग्यस्थानात राहू प्रवेश करीत आहे. सध्या राहू सोबत नेपच्यूनची उपस्थिती असणार आहे. एकूण हा योग नवमस्थानात खूपच शुभदायक ठरणार आहे. सकारात्मक मानसिकतेने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जा. उद्योगधंद्यात, नोकरीत आपण आखलेल्या योजनांची पूर्तता होण्याचे प्रसंग अनुभवू शकाल. राजकारणात, सामाजिक कार्यात आपल्या मुत्सद्दीपणाचे कौतुक होईल. दूरचे प्रवास होतील. तिर्थक्षेत्री जाण्याचे योग येतील.अपूर्ण कामे पूर्ण होऊन त्यातून धनलाभ संभवतो. आर्थिक कक्षा रुंदावतील.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सिंह राशीच्या व्यक्तींना बुध व राहूच्या युतीतून आर्थिक लाभ होऊ शकतो. बँक बॅलन्स व संपत्तीच्या वाढीला आपली कारणीभूत ठरणार आहे त्यामुळे अशा लोकांनी आपल्या बोलण्यावरती संयम ठेवावा. विवाहइच्छुक व्यक्तींना उत्तम स्थळ सांगून येऊ शकते. लग्न योग आहे. सिंह राशीत राहू अष्टमात असताना केतू राहूच्या समोरच्या स्थानात म्हणजे सप्तमस्थानात असतो. राजकारणात सामाजिक जीवनांत आर्थिक व्यवहार चोख ठेवावेत. त्यातून मानहानी, चुकीचे आरोप, गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यावी

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

राहु जेव्हा पंचमात असतो तेव्हा केतू एकादशात असतो. मात्र यावेळी कन्या राशीतील हा लाभस्थानातील केतू खूपच लाभदायक ठरेल. राहूच्या सगळ्या उणीवा हा केतू संयम बाळगून आपला पराक्रम सिद्ध करील. अनपेक्षितरित्या धनलाभाचे प्रसंग निर्माण होतील. उद्योगधंद्यात नोकरीत नवीन नवीन संधी प्राप्त होतील. राजकारण, सामाजिक कार्यात आपले वर्चस्व कायम राखू शकाल. दुरच्या प्रवासाचे योग घडून येतील. त्यातील ओळखी परिचयातून लाभ संभवतील. प्रेमाची नाती सुधारतील.

हे ही वाचा<< ३६ दिवसांनी शनी होणार शक्तीशाली, ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी; होळीआधी लागेल श्रीमंतीचा रंग

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी आहे. आपल्याबद्दलची माहिती सर्वांसमोर उघड करू नका. या काळात खऱ्या अर्थाने मीन राशीतील गुरुची बुद्धीमत्ता विद्वत्ता दिसून येईल. या काळात आपल्या ज्ञानाचा खरा उपयोग जरी यांनी उद्योगधंद्यात, नोकरीत केला तर तो खूप महत्त्वाचा ठरेल. कटू बोलणे टोकाची भूमिका घेणे टाळा. समोरच्या व्यक्तीला क्षमा करून पुढची पावले उचला. मानहानी आरोप होणार नाहीत यांची काळजी घ्या. या कालावधीत गुंतवणुकीला सुरुवात जरी केली तरी तुम्हाला मोठा धनलाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader