ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव न्यायदेवता आहेत. त्यामुळे शनि ज्यांच्या राशिला येतात, त्यांना खडतर अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कधी दु:ख इतकं बोचरं असतं की सहनही होत नाही. त्यामुळे शनिदेवांना शरण जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. ज्या लोकांच्या जीवनात अडचणी, दु:ख आणि आव्हानं कमी होण्याचं नाव घेत नाहीत, अशा लोकांना शनि उपासना करण्याचा सल्ला दिला जातो. ज्या लोकांवर शनि भारी आहे. कुंडलीत शनि अशुभ स्थितीत आहे किंवा साडेसाती, ढय्या वगैरे सुरु असेल तर येणारा शनिवार तुमच्यासाठी खास आहे. शनिदेवांचा शनिवार हा दिवस आहे. पंचागानुसार या ८ जानेवारीला शनिवार असून पौष महिन्यातील शुक्ल पक्ष षष्टी तिथी आहे.

अंकशास्त्रानुसार, ८ ही शनिची संख्या मानली जाते. कॅलेंडरनुसार शनिवार ८ तारखेला आहे. त्यामुळे ८ जानेवारी २०२२ हा शनिदेवाची उपासना करण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. मिथुन आणि तूळ राशीत शनीची ढय्या तर धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना शनिची साडेसाती सुरु आहे. या पाच राशींवर शनीची विशेष दृष्टी आहे. त्यामुळे पाच राशींच्या लोकांकडे शनिदेवाला प्रसन्न करण्याची उत्तम संधी आहे. ज्यांच्या कुंडलीत शनीची महादशा, अंतर्दशा किंवा प्रत्यंतर दशा आहे त्यांच्यासाठीही हा दिवस शुभ आहे. या दिवशी शनि चालिसाचे पठण आणि शनिशी संबंधित वस्तूंचे दान केल्याने चांगले फळ मिळते. या दिवशी शनि मंत्राचा जप केल्याने अनेक प्रकारची संकटं दूर होण्यास मदत होते.

shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shani surya budha will make tigrahi yog 2025
Tirgrahi Yog 2025 : ५० वर्षांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब! बुध, सूर्य अन् शनीच्या संयोगाने होतील गडगंज श्रीमंत, वाढेल मानसन्मान
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
The luck of these zodiac signs will shine on January 28th
२८ जानेवारीला चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शुक्र ग्रह निर्माण करणार मालव्य राजयोग!
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख

वर्ष २०२२ मध्ये ग्रह नक्षत्रांमुळे होतोय धन राज योग; चार राशींच्या लोकांना मिळणार लाभ

ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला कर्माचा दाता देखील म्हटले आहे. शनिदेवाला सर्व ग्रहांचे न्यायाधीश म्हटले जाते. शनि व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे शुभ आणि अशुभ फळ देतात. कठोर परिश्रम, नियम आणि शिस्त शनिदेवाला अधिक प्रिय आहे.

या गोष्टींची विशेष काळजी घ्या

  • वृद्ध, दुर्बल आणि कष्टकरी व्यक्तीचा अपमान करू नका.
  • पशु-पक्ष्यांना इजा करू नका. त्यांचे संरक्षण आणि सेवा करा.
  • तुम्ही गरिबांना धान्य, काळे ब्लँकेट इत्यादी दान करू शकता.
  • कुष्ठरुग्णांची सेवा करा.
  • चुकीच्या गोष्टी करू नका.

Story img Loader