8 january 2024 rashi bhavishya in marathi: आज ८ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे आणि बुधवारचा दिवस आहे. नवमी तिथी आज दुपारी २ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहील. आज रात्री ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत सिद्ध योग राहील. तसेच अश्विनी नक्षत्र आज दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत राहील. अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती शिक्षण क्षेत्रात अव्वल मानल्या जातात. याशिवाय, ते गूढ विषयांचा अभ्यास करणारे देखील मानले जातात. आज राहू काळ सायंकाळी १२ वाजल्यापासून सुरू होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. दरम्यान, आजचा अश्विनी नक्षत्र मेष ते मीन राशींना मिळवून देईल का धन आणि सुख, जाणून घेऊयात…

८ जानेवारी पंचांग व राशिभविष्य : (8 January 2024 Horoscope)

Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह ‘या’ राशींवर होणार धन-सुखाचा वर्षाव, तुमच्यावर असणार का लक्ष्मीची कृपा? वाचा राशिभविष्य
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Aries To Pisces 7th November Horoscope In Marathi
७ नोव्हेंबर पंचांग : आज स्वामींच्या कृपेने १२ पैकी कोणत्या राशी होतील धनवान; तुमच्या आयुष्यात येतील का सुखाचे क्षण? वाचा गुरुवारचे राशिभविष्य
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य

मेष:- अवांछित खर्च सामोरे येऊ शकतात. बहु राष्ट्रीय कंपनीत काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. डोळ्यांची काळजी घ्यावी. मनात नसत्या शंका आणू नका. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.

वृषभ:- आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांसोबत दिवस मजेत घालवाल. मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. आवडीची खरेदी केली जाईल.

मिथुन:- कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. दिवसभर कामाची धांदल राहील. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. आर्थिक गणित सोडवता येईल. वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात.

कर्क:- धार्मिक बाबीत रस घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनातील समस्या दूर कराव्यात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. धार्मिक स्थळाला भेट द्याल.

सिंह:- जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. पोटाचे विकार संभवतात. मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात. अचानक लाभाची शक्यता. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे.

कन्या:- जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संध्याकाळी एखादे सरप्राइज मिळेल. भागीदारीत चांगला नफा मिळेल. जनसंपर्कात वाढ होईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

तूळ:- इतरांच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ शकतो. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. उगाचच चिडचिड होऊ शकते. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.

वृश्चिक:- आजोळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. आपले छंद जोपासावेत. प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल.

धनू:- कौटुंबिक जीवनात चांगले बदल होतील. घरातील ज्येष्ठांची सेवा करता येईल. अधिक वेळ घरगुती कामात घालवाल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल. जवळचा प्रवास सुखाचा होईल.

मकर:- आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करावा. रखडलेली कामे तडीस नेता येतील. लहान भावंडांचा हातभार लागेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. अचानक जुने मित्र भेटतील.

कुंभ:- सांपत्तिक स्थिती सुधारेल. इतरांना बोलण्यातून जिंकू शकाल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यापारी वर्ग खुश असेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल.

मीन:- आज लोक तुमच्यावर व्यक्तिमत्वावर आकर्षित होतील. विश्वासू मित्रांची साथ घ्यावी. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल. प्रेमळपणे सर्वांच्या मनात घर कराल.

Story img Loader