8th October Rashi Bhavishya & Panchang : आज ऑक्टोबर महिन्याचा आठवा दिवस आहे. आज आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी आज रात्री ११ वाजून १९ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर षष्ठी तिथी सुरु होईल. तसेच उद्या सकाळी पहाटे ४ वाजून ०८ मिनिटांपर्यंत ज्येष्ठ नक्षत्र जागृत असेल. त्याचप्रमाणे ६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत आयुष्यमान योग राहील. आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचप्रमाणे आज मंगळवारी नवरात्रीचा सहावा दिवस आहे. आजचा रंग लाल असून देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाईल. देवी कात्यायनीची पूजा केल्याने धन, धर्म, काम, मोक्ष प्राप्त होतो. तर आज देवी कात्यायनी तुमच्या राशीच्या कुंडलीत काय घेऊन येणार जाणून घेऊयात…

८ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- बोलक्या स्वभावाचा फायदा होईल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. नातेवाईकांची एखादी कृती मन खिन्न करू शकते. सासरच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. वाहन चालवताना खबरदारी घ्यावी.

वृषभ:- उत्तम प्रशासक बनाल. आपला सन्मान वाढेल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. बोलताना तारतम्य बाळगा.

मिथुन:- सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. अति धाडस करू नका. कामात दुर्लक्ष करू नका. हातातील काम व्यवस्थित पूर्ण होईल. मित्रांशी असलेले नाते घट्ट होईल.

कर्क:- अविचाराने पैसा खर्च करू नका. बाजू मांडून गैरसमज दूर करा. घरातील वातावरण खेळकर राहील. मन विचलीत होण्यापासून थांबवा. विरोधक परास्त होतील.

सिंह:- अचानक प्रवास करावा लागेल. हवे असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आपला प्रभाव वाढेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. छोटे प्रवास लाभदायक ठरतील.

कन्या:- नवीन उधारी देऊ नका. व्यवसायात कोणाच्याही बोलण्यावर संपूर्ण विश्वास ठेऊ नका. ग्रहमानाचे पाठबळ लाभेल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च केला जाईल. प्रलंबित येणी प्राप्त होतील.

तूळ:- सर्वांशी गोड बोलून कार्यभाग साधाल. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. जमिनीचे व्यवहार पूर्ण कराल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. प्रयत्नात सकारात्मकता दिसून येईल.

वृश्चिक:- घरातील मोठ्यांचा आदर करावा. स्पर्धेत यश मिळेल. मनातील विचारांना योग्य दिशा द्या. मानसिक शांतता जपावी. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील.

धनू:- आपल्या बोलण्यावर संयम ठेवा. व्यावसायिक ठिकाणी प्रशंसा केली जाईल. नियोजित कामे पूर्णत्वास जातील. मित्रांची मदत घ्याल. अति विचार करू नका.

मकर:- जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढीस लागेल. हातातील काम पूर्णत्वास जाईल. वरिष्ठांची मदत मिळेल. मनोरंजनात वेळ घालवाल.

कुंभ:- नियोजनबद्ध कामे केली जातील. समोरील कामाकडे अधिक लक्ष द्यावे. हातातील संधी सोडू नका. आहारावर नियंत्रण हवे. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

मीन:- शांत राहून कामे करावीत. आततायीपणे कोणतीही कृती करू नका. सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. सन्मानात वाढ होईल. भडक डोक्याने वागू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8th october rashi bhavishya panchang on navratri six day katyayani devi makes mesh to meen day special read horoscope in marathi asp
Show comments