09 April Rashibhavishya in Marathi: आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी रात्री १० वाजून ५६ मिनिटांपर्यंत राहील. आज सकाळी ८ वाजून ५३ मिनिटांपर्यंत स्थैयजयद योग राहील. माघ नक्षत्र आज सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर पूर्वाफाल्गुनी नक्षत्र सुरू होईल. तसेच आज राहू काळ दुपारी ३ ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. याशिवाय आज वामन द्वादशी व्रत पाळले जाईल. तर आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

९ एप्रिल पंचांग व राशिभविष्य ( Today’s Aries To Pisces Horoscope In Marathi)

मेष (Aries Horoscope Today)

कामाचा व्याप वाढेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढा. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. बौद्धिक ताण जाणवेल. जामीन कीच्या व्यवहारात अडकू नका.

वृषभ (Taurus Horoscope Today)

झोपेची तक्रार जाणवेल. मनातील निराशा बाजूस सारावी. अनाठायी खर्च करू नये. तरुण वर्गाची मते विचारात घ्याल. कामे वेळेत पार पडतील.

मिथुन (Gemini Horoscope Today)

व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीने पाऊल उचलाल. आरोग्यात सुधारणा होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. चांगल्या संगतीत दिवस जाईल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क (Cancer Horoscope Today)

दिलेली योग्य वेळ पाळता येईल. मनाजोगी खरेदी करता येईल. बौद्धिक मूल्यमापन कराल. विशिष्ट धोरण ठेवून वागाल. बौद्धिक छंदांसाठी वेळ काढावा.

सिंह (Leo Horoscope Today)

मानसिक स्थैर्य जपावे. काही गोष्टींत कंजूसपणा दाखवाल. कफ विकाराचा त्रास जाणवेल. अती विचार करू नये. भागिदारीतून चांगला फायदा होईल.

कन्या (Virgo Horoscope Today)

जोडीदाराच्या सुरक्षितपणाचे कौतुक कराल. सहकार्‍यांची उत्तम प्रकारे साथ मिळेल. बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. व्यापारी वर्गाला लाभ होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.

तूळ (Libra Horoscope Today)

छंद जोपासला वेळ काढाल. कौटुंबिक बाबतीत शांतता ठेवावी. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. काही कामे विनासायास पार पडतील. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. कर्तबगारीला नवीन वाटा फुटतील घरगुती वातावरण प्रसन्न असेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. भावंडांना मदत करावी लागेल.

धनू (Sagittarius Horoscope Today)

मागचा पुढचा विचार करून खर्च करा. गरज असेल तरच शब्दांचा वापर करा. जवळचे मित्र भेटतील. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद संभवतात. कौटुंबिक खर्चाचा आकडा पुनर्विचारात घ्या.

मकर (Capricorn Horoscope Today)

काही गोष्टींचा चंग बांधावा. क्षुल्लक गोष्टींवरून होणारा गैरसमज टाळावा. तुमच्यातील कार्य कुशलता वाढीस लावावी. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. स्वत:साठी वेळ काढा.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. जुनी कामे पुन्हा समोर येऊ शकतात. खर्चाचा आकडा कोलमडू देऊ नका. आधुनिक गोष्टी समजून घ्याव्यात. अघळ-पघळ बोलणे टाळा.

मीन (Pisces Horoscope Today)

मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. चित्रकलेची आवड जोपासाल. मानसिक चंचलता जाणवेल. मित्रमंडळींची नाराजी दूर करावी. वादाच्या मुद्दयात अडकू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 april zodiac todays horoscope in marathi aajche rashibhavishya 9 april 2025 mesh sinha kanya meen vrushabh kark dhanu kumbh panchang aries to pisces rashi in marathi dvr