9 February 2025 Rashi Bhavishya : ९ फेब्रुवारी २०२४ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी रविवारी संध्याकाळी ७ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहील. आज त्रिपुष्कर योग संध्याकाळी ५ वाजून ५३ मिनिटांपासून पासून सुरू होऊन ७ वाजून २६ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच आर्द्रा नक्षत्र संध्याकाळी ५ वाजून ५३ मिनिटांपर्यंत जागृत असेल. राहू काळ ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजेपर्यंत असेल. तर आज त्रिपुष्कर योगात कोणाचा शुभ काळ सुरु होणार हे आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope) :

मेष:- कामाची लगबग राहील. काही अनपेक्षित बदल जाणवतील. लहान मुलांच्यात रमून जाल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. हातातील कामात यश येईल.

वृषभ:- प्रवासात काहीसा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. काही कामात अडकून पडल्यासारखे वाटू शकते. मनातील इच्छेला पूर्णत्व येऊ शकते. जिथे जाल तिथे आनंद वाटाल.

मिथुन:- औद्योगिक वातावरण चांगले राहील. काही गोष्टी अनपेक्षितपणे लाभतील. आवडते खाद्यपदार्थ चाखायला मिळतील. तुमची समाजप्रियता वाढेल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल.

कर्क:- वैवाहिक सौख्याकडे लक्ष ठेवावे. चिकाटी सोडून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जुनी कामे नव्याने सामोरी येतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

सिंह:- व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. मनातील संकोच दूर सारावा. जवळच्या व्यक्तीजवळ मोकळे करावे. कामातून समाधान शोधाल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.

कन्या:- जोडीदाराच्या मताचा आदर कराल. काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. घरातील समस्या जाणून घ्याव्यात. अचानक धनलाभ संभवतो. स्थावरची कामे मार्गी लागतील.

तूळ:- कामाला योग्य दिशा मिळेल. उत्कृष्ट साहित्य वाचनात येईल. घरातील कामात अधिक लक्ष घालावे लागेल. तुमच्या अधिकारात वाढ होईल. कामे वेळेत पूर्ण करता येतील.

वृश्चिक:- आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. मत्सराला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य गणित मांडावे. गरज पाहून खर्च करावा.

धनू:- शांत व संयमी विचारांची जोड घ्यावी. उतावीळपणा करून चालणार नाही. आपले कष्ट सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देवू नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

मकर:- मानसिक चंचलता जाणवेल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल. काही कामे तुमचा कस पाहतील.

कुंभ:- श्रमामुळे थकवा जाणवेल. मैत्रीचे संबंध जपावेत. पैशाचे गणित तपासून पहावे लागेल. कामात चंचलता आड आणू नका. नवीन लोकांच्यात मिसळावे.

मीन:- गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील. झोपेची तक्रार दूर करावी. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. हातातील कामात यश येईल. चांगला व्यावसायिक लाभ संभवतो.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर