Guru Yuva Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रहाने युवावस्थेत गोचर सुरु केले आहे. कोणताही ग्रह दोन टप्प्यांमध्ये गोचर करत असतो एक टप्पा म्हणजे युवा, दुसरा टप्पा म्हणजे वृद्ध. कोणताही ग्रह युवा टप्प्यात असताना अत्यंत प्रभावशाली असतो. त्याचा प्रभाव हा वेगाने पसरत असतो. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार गुरु ग्रहाने १९ जानेवारी रोजी युवा अवस्थेत प्रवेश केला आहे, ९० अंशातून प्रवास करताना यापुढील काही दिवस गुरूचा प्रवास हा स्पष्ट आणि थेट असेल. या प्रभावाने पुढील काही महिने तीन राशींच्या मंडळींना धन लाभ व मान- सन्मानात वृद्धी झाल्याचे जाणवणार आहे. या तीन भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना कोणत्या रूपात लाभ होऊ शकतो हे पाहूया..
गुरु युवावस्थेत जाताच ‘या’ राशींचा होईल भाग्योदय
मेष रास (Mesh Rashi Bhavishya)
या मंगळाच्या राशीत गुरू-राहू-हर्षल यांचा एकूण सहवास कौटुंबिक सौख्याला त्रासदायक ठरला तरी गुरूची सप्तम स्थानावरील दृष्टी आकाशतत्त्वाच्या नियमाप्रमाणे व्यापक राहील. गैरसमज, वादविवाद फारसे विकोपाला जाणार नाहीत तर व्ययातील मीनेचा नेपच्यून चतुर्थस्थानावर आपली नवपंचम दृष्टी कायम शुभदायक ठेवील. भाग्येश गुरू लग्नी आहे. राहू जरी सोबत असला तरी गुरू आपल्या उद्योगधंद्यात, नोकरीत मदतीचा ठरेल.नव्या योजना राबवण्यासाठी घाई करू नका. तुम्ही सध्या करत असलेल्या कामात एकाग्रता वाढवल्यास होणारा धनलाभ हा दुप्पटीने वाढू शकतो. वाणीचा योग्य वापर करा.
धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)
मागच्या दाराने येणारी खोटी आपुलकी, प्रेम यात जास्त गुंतू नका. समोरच्याला ओळखण्याचे कसब अंगी असू द्या. म्हणजे मनस्तापाची पाळी येणार नाही. विशेषतः आरोग्याची काळजी घ्या. गुरु आपल्या राशीत धन- धान्य समृद्धी व प्रॉपर्टीच्या संबंधित पाचव्या स्थानी गोचर करणार आहे. यामुळेच येत्या काळात सर्व आघाड्यांवर आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. या काळात गुंतवणूक करणे देखील तुमच्यासाठी अनुकूल ठरु शकते. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंदच आनंद मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा << २४ जानेवारी पंचांग: पौष पौर्णिमेला मिथुनसहित चार राशींना लाभणार सुखाचे क्षण; मानधन वाढण्याची संधी तर काहींना..
मीन रास (Pisces Rashi Bhavishya)
मीन राशीच्या लोकांसाठी गुरु युवावस्थेत भ्रमण करणे अनुकूल ठरू शकते. कारण गुरु तुमच्या कुंडलीतून पाचव्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. मुलांची प्रगती होऊ शकते. तसेच तुम्हाला अचानक पैसे देखील मिळू शकतात. नोकरदारांसाठी ऑफिसमध्ये कामाचे चांगले वातावरण असेल तर नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवी नोकरी मिळू शकते. गुरु तुमच्या राशीच्या कर्म स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)