9th December 2024 Marathi Daily Horoscope : सोमवारी ९ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील दुर्गाअष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी सोमवारी सकाळी ८ वाजून ०३ पर्यंत असेल, त्यानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल. ९ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजून ०६ पर्यंत सिद्धी योग राहील. तसेच पूर्वाभाद्रपद नक्षत्र दुपारी २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत राहील. याशिवाय ९ डिसेंबरला पंचक आहे. एकूणच ग्रहमानानुसार व पंचांगानुसार मेष ते मीन राशींना आठवड्याचा पहिला दिवस कसा जाईल पाहूया…

९ डिसेंबर २०२४ पंचांग व राशिभविष्य; कुणाचं नशीब उजळणार? (Horoscope Today, 9 December 2024)

मेष:- मानसिक चुळबुळ कमी करावी. काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो. खर्चात वाढ संभवते. आर्थिक नियोजनावर विचार कराल.

12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला मिळेल प्रार्थनेचे फळ तर व्यवसायिकांचा असेल सोन्याचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Daily Horoscope 11 December 2024 in Marathi
११ डिसेंबर पंचांग: मोक्षदा एकादशीला धनूसह ‘या’ राशींना भगवान विष्णूसह लक्ष्मीही देईल आशीर्वाद; वाचा तुमचा बुधवार कसा जाणार?
Budh Uday In Scorpio 2024 horoscope 2025
Budh Uday 2024 : ९ तासांनंतर बुध उदयाने एका झटक्यात ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही व्हाल कोट्यधीश?
10 December Mesh To Meen Horoscope in Marathi
१० डिसेंबर पंचांग: आज वृषभसह ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचा योग; आज काय घडल्याने १२ राशींचे मन होईल प्रसन्न? वाचा मंगळवारचे राशिभविष्य
kharmas 2024 horoscope surya gochar 2024 in marathi
Kharmas 2024: १५ डिसेंबरपासून ‘या’ चार राशींवर मिळेल बक्कळ पैसा! खरमास सुरू होताच सूर्यदेवाच्या आशीर्वादाने धनलाभाची संधी
Kanya Rashifal 2025
नववर्षात कन्या राशीच्या लोकांच्या व्यवसाय आणि करियरवर होईल वाईट परिणाम? जाणून घ्या कसे जाईल २०२५?
7 December astrological predictions for zodiac signs
७ डिसेंबर पंचांग: धनिष्ठा नक्षत्रात १२ राशींवर होणार सुखाचा वर्षाव; पद, पैसा, प्रतिष्ठेत होईल वाढ, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय खास?

वृषभ:- नवीन काम अंगावर येऊ शकते. विद्यार्थी वर्ग खुश असेल. दिवस बर्‍यापैकी व्यस्त राहील. कामे उरकताना दमछाक होऊ शकते. आपली क्षमता लक्षात घ्यावी.

मिथुन:- कामात सकारात्मक बदल संभवतात. नियोजनबद्ध कामे करा. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका. मन स्थिर ठेऊन विचार करावा. चंचलतेवर मात करावी लागेल.

कर्क:- आपल्या धाडसाचे फळ मिळेल. कचेरीची कामे मार्गी लावाल. ग्रहमानाची साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मुलांबाबत आत्मविश्वास वाढेल.

सिंह:- अपेक्षित उत्तर हाती येईल. लहान प्रवास घडेल. कामात अनुकूलता येईल. हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल.

कन्या:- मानसिक स्वास्थ्य जपावे. इतरांना सढळ हाताने मदत कराल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. सहकारी वर्ग मदत करेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.

तूळ:- महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. संभ्रमित गोष्टी पुढे ढकलाव्यात. दिवस संमिश्र राहील. हातातील काम यशस्वी होईल. बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा.

वृश्चिक:- एखादी नवीन संधी चालून येईल. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते. गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका. एखादा वाद संपुष्टात येईल.

धनू:- घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील. तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल.

मकर:- अति धाडस दाखवू नका. मोठी खरेदी विचारपूर्वक करावी. जुगार खेळतांना सावध राहावे. हातातील गोष्टी जपून ठेवा. जुनी कामे आधी मार्गी लावावीत.

कुंभ:- आपले स्पष्ट मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे. बौद्धिक क्षमता वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरगुती गैरसमज टाळावेत.

मीन:- काही खर्च अचानक सामोरे येतील. नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल. जवळचे मित्र भेटतील. हातातील कामातून आनंद मिळेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा.

(

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )

Story img Loader