9th July Panchang & Rashi Bhavishya: आज ९ जुलै २०२४ ला आषाढ महिन्यातील पहिली चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार शुक्ल पक्षातील चतुर्थी ही विनायक चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. आज सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी तृतीया तिथी समाप्त होताच विनायकीचा प्रारंभ होणार आहे. आषाढ हा देवशयनी एकादशीमुळे पवित्रा महिना मानला जातो त्यामुळे या विनायकी चतुर्थीला सुद्धा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आज रात्री २ वाजून २६ मिनिटांपर्यंत सिद्धी योग असणार आहे. तसेच आज दिवसभर मघा नक्षत्र जागृत असेल. आषाढातील या पहिल्या मंगळवारी अंगारक योग सुद्धा चतुर्थीसाठी जुळून आला आहे. एकूणच हा शुभ दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

९ जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:-विवाहाची बोलणी लांबणीवर पडू शकतात. परिचयातील व्यक्तीचे हित ओळखावे. अनोळखी व्यक्ति मदत करतील. मेहनतीला पर्याय नाही. विरोधक नामोहरम होतील.

वृषभ:-विचारपूर्वक निर्णय घ्यावा. भागीदारीच्या व्यवसायाकडे लक्ष ठेवावे. अति उत्साहाने कामे बिघडू शकतात. मित्रांच्या भेटीने शुभ वार्ता मिळतील. उगाच तर्क-वितर्क करत बसू नका.

मिथुन:-आंधळा विश्वास ठेऊ नका. नेमक्या मुद्यांवर लक्ष ठेवा. आर्थिक अडचण फार जाणवणार नाही. कुटुंबातील सदस्यांची मते जाणून घ्या. गोडी-गुलाबीचे धोरण ठेवावे.

कर्क:-आहारावर नियंत्रण ठेवावे. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. घरगुती गोष्टीत तिखट प्रतिक्रिया देऊ नका. मन विचलीत होऊ शकते. जुनी कामे आधी हातावेगळी करावीत.

सिंह:-चर्चेतून मार्ग काढावा. गुंत्यातून बाहेर पडाल. हातातील कामात यश येईल. मित्रांच्या भेटीचे योग आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

कन्या:-भडक मार्गाचा अवलंब करू नका. मनाची चंचलता आवरावी लागेल. फसवणुकीपासून सावध राहावे. प्रलंबित कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. ज्येष्ठांची काळजी घ्यावी.

तूळ:-काही तरी नवीन शिकल्याचा आनंद मिळेल. कौशल्याने कामे कराल. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. समस्यांचे निराकरण होईल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

वृश्चिक:-जुने गैरसमज दूर होतील. अवाजवी खर्च टाळावा. दिवस प्रसन्नतेत जाईल. कामातील सुलभतेकडे अधिक लक्ष ठेवाल. पित्त विकारात वाढ होऊ शकते.

धनू:-उपासनेत मन रमवावे. शांतता हवीशी वाटेल. वाहन विषयक समस्या मिटतील. मुलांचे वागणे नाराजीचे भासू शकते. सकारात्मक दृष्टीकोनात वाढ होईल.

मकर:-घरातील वातावरण शांत ठेवावे. यांत्रिक कामात लक्ष घालाल. स्थावरचे प्रश्न मार्गी लावावेत. नियोजित कामे पार पडतील. वैचारिक स्थैर्य जपावे.

कुंभ:-वादाचे मुद्दे टाळावेत. दिवस आळसात घालवू नका. देण्या-घेण्याचे व्यवहार पूर्ण होतील. जवळच्या मित्रांशी वाद घालू नका. चैनीत दिवस घालवाल.

हे ही वाचा << लक्ष्मी नारायण योग पुढील २३ दिवस ‘या’ ५ राशींना देईल प्रचंड धन-दौलत; नशिबात राजासारखं जीवन जगण्याची संधी

मीन:-आरोग्यात सुधारणा होईल. आततायीपणे वागून चालणार नाही. खर्च नियोजनात ठेवावा. अपचनाचा त्रास जाणवू शकतो. आर्थिक गोष्टीवरून वाद टाळावा.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9th july panchang marathi rashi bhavishya ashadhi vinayak chaturthi siddhi yog angarki special horoscope of aries to pisces astrology today svs
Show comments