9th June Panchang & Rashi Bhavishya: ९ जून २०२४ ला ज्येष्ठ शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असणार आहे. रविवारी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांपर्यंत तृतीया तिथी कायम असेल व मग चतुर्थीला सुरुवात होईल. संध्याकाळी ८ वाजून २० मिनिटांपर्यंत पुनर्वसू नक्षत्र जागृत असणार आहे. संध्याकाळी ५ वाजून २१ मिनिटांपर्यंत केलेल्या कामांना वृद्धी योगाची मदत होणार आहे. सूर्य आज वृषभ राशीत तर चंद्र मिथुन राशीत स्थिर असणार आहे. संध्याकाळी ५ वाजून ३४ मिनिटांपासून ते ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत राहू काळ असेल पण आजचा उर्वरित दिवस शुभ आहे. मेष ते मीन राशीला आजचा रविवार सुख, शांती आराम आणणार की कष्ट घेऊन येणार हे पाहूया. वाचा तुमच्या राशीचे भविष्य

९ जून पंचांग व राशी भविष्य

मेष:-कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. चविष्ट पदार्थ खायला मिळतील. मधुर वाणीने सर्वांना खुश कराल. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल.

Daily Horoscope 13 January 2025
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
shani surya budha will make tigrahi yog 2025
Tirgrahi Yog 2025 : ५० वर्षांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब! बुध, सूर्य अन् शनीच्या संयोगाने होतील गडगंज श्रीमंत, वाढेल मानसन्मान
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
Shani and shukra made dhanadhya yoga
३० वर्षानंतर धनाढ्य योगामुळे ‘या’ राशींचे नशीब चमकणार! शनी आणि शुक्राची होईल असीम कृपा
When will the solar and lunar eclipses
वर्ष २०२५मध्ये केव्हा लागणार सुर्यग्रहण आणि चंद्रग्रहण! जाणून घ्या तारीख आणि भारतात कधी दिसणार की नाही?

वृषभ:-आर्थिक मानात सुधारणा होईल. हाती घेतलेले नवीन काम पूर्ण होईल. सर्वांवर तुमची उत्तम छाप पडेल. कौटुंबिक खर्च जपून करावा. मुलांवरील खर्च वाढू शकतो.

मिथुन:-कामात फार कोणावरही विसंबून राहू नका. कायद्याचे नियम डावलून चालणार नाही. स्त्री सौख्यात भर पडेल. क्षणिक आनंदात न्हाहून निघाल. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील.

कर्क:-आंतरिक इच्छा पूर्ण होतील. काही नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. काही कामात अधिक ऊर्जा वापरावी लागेल. प्रेम संबंध अधिक घट्ट होतील. प्रवासात काळजी घ्यावी.

सिंह:-काही समस्यांतून वेळीच मार्ग निघेल. जवळचे संबंध अधिक प्रभावीपणे हाताळाल. खोलवर चिंतनाची गरज भासू शकते. हातातील मिळकतीवर अधिक लक्ष केन्द्रित करावे. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होईल.

कन्या:-मानसिक आरोग्य उत्तम राहील. नवीन योजनांना खतपाणी घालावे. कमिशन मधून चांगला मोबदला मिळेल. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. सहकार्‍यांशी सुसंवाद साधावा.

तूळ:-अचानक धनलाभाची शक्यता. मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. नसते साहस अंगाशी येऊ शकते. आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल.

वृश्चिक:-जोडीदाराशी मनाजोगा प्रेमालाप कराल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. भावंडांना मदत करावी लागेल. क्षुल्लक गोष्टींनी चिडू नका. नवीन कामात सतर्कता बाळगा.

धनू:-आपले उद्दीष्ट गाठण्याचा प्रयत्न करा. भागीदारीत चर्चेला महत्व द्यावे. जोडीदाराशी मतभेद वाढवू नका. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. कामातून अपेक्षित समाधान लाभेल.

मकर:-शारीरिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन कामात घाई करून चालणार नाही. प्रेम सौख्यात वाढ होईल. नवीन मैत्रीचे संबंध जोडले जातील. प्रवास जपून करावेत.

हे ही वाचा<< २६८ दिवस घरी नांदणार लक्ष्मी; शनीची चाल करणार ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करणार मालामाल

कुंभ:-मनातील व्याकूळता बाजूला सारावी लागेल. अनाठायी खर्च होण्याची शक्यता. घरातील वातावरण प्रसन्न राहील. बाग कामात गढून जाल. जोडीदाराशी क्षुल्लक खटके उडण्याची शक्यता.

मीन:-रागाला आवर घालावा लागेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. निसर्ग सौंदर्याकडे ओढ वाढेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. फार हट्टीपणा करू नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader