Chanakya Niti Tips : आचार्य चाणक्य यांना अर्थशास्त्र आणि नीतीशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी आयुष्य जगण्याच्या पद्धतींच्या कित्येक पैलूंबाबत सांगितले आहे. त्यांनी आपल्या नीती ग्रंथ म्हणजेच ‘चाणक्य नीती’मध्ये मनुष्याचे आयुष्य सोपे आणि यशस्वी करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच त्यांनी आपल्या नीतीमध्ये अशा एका गोष्टीचा उल्लेख केला आहे की, जी मनुष्य स्वत:बरोबर घेऊन जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृत्यूनंतर मनुष्य फक्त एकच कोणती गोष्ट स्वत:बरोबर घेऊन जातो?

मनुष्य या जगात एकटाच जन्माला येतो. एवढंच नव्हे, तर प्रत्येक व्यक्ती मृत्यूनंतर स्वर्ग किंवा नरकातदेखील एकटीच जाते. पण, आचार्य चाणक्य सांगतात की कोणतीही व्यक्ती मृत्यूनंतर स्वत:बरोबर एक गोष्ट आवर्जून घेऊन जाते आणि ती म्हणजे व्यक्तीचे कर्म.

हेही वाचा – कोणासाठी चांगला तर कोणासाठी त्रासदायक… कसा असेल सर्व राशींसाठी ‘हा’ आठवडा? जाणून घ्या

चांगले कर्म का केले पाहिजे?

आचार्य चाणक्यांनी सांगितल्यानुसार, मनुष्याला आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ एकट्यालाच भोगावे लागते. एका मनुष्याच्या कर्माचे फळ दुसरी व्यक्ती भोगू शकत नाही. त्यामुळे असे म्हणतात की, व्यक्तीने नेहमी चांगले कर्म केले पाहिजे.

हेही वाचा – प्रत्येक स्त्री-पुरुषाने ‘ही’ चार कामे केल्यानंतर त्वरित करावी अंघोळ! चाणक्य नितीमध्ये सांगितले कारण…

भोगावे लागते वाईट कर्माचे फळ

मनुष्याच्या जीवनात कर्म खूप महत्त्वाचे आहे. चाणक्य नीतीनुसार, मनुष्य जसे चांगले कर्म करतो, तसेच वाईट कर्मही करतो. मृत्यू जवळ आल्यानंतर व्यक्तीला त्याच्या कर्मावरूनच त्याला स्वर्ग मिळेल की नरक हे ठरते, असे मानले जाते. जे लोक जीवनामध्ये वाईट कामांचा आधार घेतात, त्यांना त्याची वाईट फळे भोगावी लागतात. त्यांची त्यापासून सुटका होऊ शकत नाही.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A person takes these his karma with him after death says chanakya niti in marathi snk