Maha Shivratri 2025 : हिंदू पंचांगनुसार, यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह पार पडला होता. ज्योतिषशास्त्रानुसार, या वेळी महाशिवरात्रीच्या दिवशी एक मोठा दुर्लभ संयोग निर्माण होणार आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी या वेळी जवळपास ६० वर्षानंतर धनिष्ठा नक्षत्र, परीघ योग, शकुनी करण आणि मकर राशीमध्ये चंद्र विराजमान राहणार आहे. अशात ज्योतिषशास्त्राच्या मते, हा दुर्लभ संयोग राशिचक्रातील तीन राशींसाठी लाभदायक ठरू शकतो. जाणून घेऊ या, महाशिवरात्रीच्या दिवशी दुर्लभ संयोग कोणत्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष राशी

ज्योतिषशास्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी निर्माण होणार दुर्लभ संयोग मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या दिवशी मेष राशीच्या लोकांचा गोल्डन टाइम सुरू होईल. या दरम्यान या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार. धन संपत्तीचे आगमन होऊ शकते तसेच या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय या लोकांना मनाप्रमाणे नोकरीची संधी मिळू शकते. पद प्रतिष्ठा मिळू शकते. कामाच्या ठिकाणी या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाईल.

मिथुन राशी

महाशिवरात्री मिथुन राशीच्या लोकांसाठी लकी ठरू शकते. या दिवसापासून या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. धन संपत्ती संबंधिक कामामध्ये यश मिळेन. नात्यात गोडवा दिसून येईल. या दरम्यान दांपत्य जीवन सुखी राहीन. नोकरी करणाऱ्या लोकांना मान सन्मान मिळू शकते. व्यवसायात या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. कुटुंबात आईवडिलांचे सहकार्य लाभेल आर्थिक संकटामध्ये मुक्ती मिळू शकते. मानसिकदृष्ट्या हे लोक प्रसन्न राहीन.

सिंह राशी

महाशिवरात्री सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल. या दरम्यान व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दुप्पट नफा मिळू शकतो. आरोग्य उत्तम राहीन. दीर्घ काळापासून सुरू असलेले वादविवादापासून दिलासा मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. जमीनीशी संबंधित कार्यांमध्ये जबरदस्त यश मिळेन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A rare sanyog created on maha shivratri 2025 three zodiac get benefits money and wealth their bank balance will be increased ndj