तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना पाहिले असेल की सकाळी उठल्यावर कोणाचा चेहरा पाहिला तर दिवसभर खराब जातो. खरं तर, शास्त्रानुसार पहाटेची वेळ शुभ मानली जाते. जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांच्यावर सूर्यदेवाची कृपा असते. त्याच्या आयुष्यातून दुर्दैव दूर होतं आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण तुम्हाला माहिती आहे का की धार्मिक शास्त्रांमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे सकाळी उठल्यानंतर माणसाने करायला हवे. असे केल्याने व्यक्तीचे नशीब पालटते. तसंच त्याचा संपूर्ण दिवस चांगला जातो. जाणून घेऊया या उपायांबद्दल…

सकाळी उठून या मंत्राचा जप करा.
धार्मिक शास्त्रांनुसार, एखाद्या व्यक्तीने सकाळी आपले तळवे जोडून सर्वप्रथम त्यांना आपल्या डोळ्याने पाहिले पाहिजे. हे देखील लक्षात ठेवा की डोळे उघडताच हे करणे आवश्यक आहे. तळहाताकडे पाहण्यापूर्वी कोणत्याही वस्तू किंवा व्यक्तीकडे पाहू नका. हे काम तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करा. यासोबतच तळहाताकडे पाहताना मंत्राचा पाठही करावा. मंत्र जाणून घ्या…

तुमचे दोन्ही तळवे पाहताना तुम्ही या मंत्राचा किमान एकदा तरी जप करा, तुम्ही मंत्र एकापेक्षा जास्त वेळा जप करू शकता.

मंत्र- “कराग्रे वसति लक्ष्मीः, कर मध्ये सरस्वती।
करमूले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम्।।“

आणखी वाचा : या अक्षरापासून नाव सुरू होणारे लोक कठोर परिश्रमाने यश मिळवतात, बुद्धिमान आणि मल्टी टॅलेंटेड असतात

ग्रहांचा राजा सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा.
रोज सकाळी उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. सूर्यदेवाला जल अर्पण करताना फक्त तांब्याचे भांडे वापरावे हे लक्षात ठेवा. कारण तांब्याचा धातू सूर्यदेवाशी संबंधित आहे. असे केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होईल. यासोबत पितृदोषापासूनही मुक्ती मिळेल. कारण सूर्यदेवाचा संबंध पितरांशी असल्याचे मानले जाते.

आनंद आणि समृद्धी टिकवून ठेवते:
दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरामध्ये सकारात्मकता राहते आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाते. त्याचबरोबर घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

आणखी वाचा : वर्षभर ‘या’ राशींवर गुरुची राहील विशेष कृपा, करिअरसोबतच व्यवसायात मिळू शकते प्रचंड संपत्ती

घराबाहेर जाताना पहिला उजवा पाय ठेवा:
धार्मिक शास्त्रानुसार कोणतेही काम उजवा हात आणि पायाने सुरु केले तर यश मिळण्याची शक्यता जास्त असते. शास्त्रानुसार सर्व धार्मिक उपासना कर्मे उजव्या हाताने केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. त्यामुळे एखाद्या कामासाठी घराबाहेर पडताना उजवा बाहेर पहिल्यांदा बाहेर काढून जावे.

आई-वडील आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या.
दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. ज्या लोकांवर त्यांचे माता-पिता प्रसन्न असतात त्यांच्यावर सर्व देवी-देवताही प्रसन्न होतात. तसेच, आई-वडिलांच्या चरणांना स्पर्श केल्याने, सूर्य आणि गुरू देखील कुंडलीत सकारात्मक असतात.