हिंदू धर्मातील अनेक धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये आजच्या जीवनाचे सार दडलेले असतात. जर एखाद्या व्यक्तीने आजच्या जीवनात या ग्रंथांमध्ये लिहिलेल्या गोष्टींचा अवलंब केला तर तो कधीही निराश होणार नाही, असं म्हटलं जातं. तसंच गरुड पुराणात व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत बरीच माहिती पाहायला मिळते. ज्यामध्ये पाप, पुण्य, कर्म, स्वर्ग, नरक, ज्ञान-विज्ञान, नीतिनियम, धर्म या गोष्टी सांगितल्या आहेत.

या पुराणात मृत्यूनंतरचं जीवनही सांगितलं आहे. ज्यामध्ये मनुष्य पृथ्वीवर जी काही कर्म करतो, त्याचेच फळ त्याला परलोकात मिळतं असं सांगितलं आहे. गरुड पुराणाचे पठण वेदपाथी ब्राह्मणाच्या घरी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर केले जाते. इथे आम्ही गरुण पुराणातील अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या आपण करू नये आणि त्या केल्याने आपले आयुष्य कमी होतं. चला जाणून घेऊया या गोष्टींबद्दल…

nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gods Guns and Missionaries The Making of Modern Hindu Identity Hindu
‘हिंदू कोण’ याचा शोध
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
Transformational Shastri and Original Eccentricity LaxmanShastri Joshi
तर्कतीर्थ विचार: परिवर्तनवादी शास्त्री आणि मौलिक विलक्षणता
Lakshman Shastri Joshi Manusmriti Dahan and Tarkatirtha
तर्कतीर्थ विचार: मनुस्मृती दहन व तर्कतीर्थ
Satguru Mata Sudiksha
मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख – माता सद्गुरू सुदीक्षाजी महाराज
basti novel loksatta
तळटीपा : ये कैसी सरहदें…

उशीरा उठणे हानिकारक आहे:
गरुड पुराणानुसार उशिरा उठणे हानिकारक ठरू शकते. आजच्या भौतिकवादी जगात माणसाची दिनचर्या खूप अस्ताव्यस्त झाली आहे. त्यामुळे तो रात्री उशिरा झोपतो आणि दिवसा उशिरा उठतो. खरं तर उशिरा उठल्यामुळे सकाळी ताजी हवा मिळत नाही. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते आणि अनेक आजार आपल्याला घेरतात.

रात्री दह्याचे सेवन धोकादायक आहे.
रात्री दही खाणे हानिकारक ठरू शकते. याचा उल्लेख गरुड पुराणात आहे. जे लोक रात्री दह्याचे सेवन करतात त्यांना श्वसन आणि थंड प्रकृतीचे आजार होण्याची शक्यता वाढते. यासोबतच काही लोक रात्री नियमितपणे दूध सेवन करतात आणि दही खाल्ल्यानंतर दूध पिणे आयुर्वेदानुसार योग्य मानले जात नाही. त्यामुळे रात्री दही खाऊ नये.

आणखी वाचा : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात सुख-सुविधांची कमतरता नसते, जीवन खुलेपणाने जगतात

स्मशानभूमीच्या धुरापासून दूर राहा:
गरुड पुराणानुसार स्मशानभूमीच्या धुरापासून दूर राहावे. कारण मृत्यूनंतर मानवी शरीर जाळले जाते, त्यानंतर त्यातील अनेक प्रकारचे विषारी घटक धुरात मिसळून वातावरणात विरघळतात. या विषारी घटकांमध्ये अनेक प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरिया असतात. जे जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासावर शरीरात पोहोचतात. जे अनेक आजारांना जन्म देऊ शकतात. त्यामुळे व्यक्तीचे वय कमी होऊ शकते.

सकाळी प्रणयापासून दूर राहा:
याचा उल्लेख गरुड पुराणात आहे. पती-पत्नीने सकाळी प्रणय करणे टाळावे. खरं तर ब्रह्म मुहूर्त हा देवाच्या उपासनेसाठी समर्पित असतो आणि यावेळी मनातील लैंगिक इच्छेमुळे व्यक्ती आजारी पडू शकते. त्यामुळे त्याचे वय कमी होऊ शकते.

आणखी वाचा : १०० वर्षांनंतर सूर्यग्रहण आणि शनिश्चरी अमावस्या एकाच दिवशी, या ३ राशींना धनलाभाची प्रबळ शक्यता

शिळे मांस खाणे हानिकारक आहे.
तसं शास्त्रात मांस खाणे निषिद्ध म्हटलं आहे. कारण तामसिक आहारात मांस येतं. यामुळे माणसाला लवकर राग येतो आणि तो दयाळू स्वभावाचा नसतो. गरुड पुराणात सांगितले आहे की कोरडे आणि शिळे मांस खाल्ल्याने कर्करोग होऊ शकतो. जुन्या मांसावर अनेक प्रकारचे परजीवी आणि जीवाणू जन्म घेतात, ज्यामुळे मानवांना अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.

Story img Loader