Tulsi Vastu Tips: तुळस ही वनस्पती जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येते. हिंदूंच्या श्रद्धेनुसार तुळस ही अत्यंत शुभ मानली जाते. कारण, त्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे, असं म्हटलं जातं. याशिवाय तुळस घरासाठी फायदेशीर मानली जाते. तुळस भरपूर ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने ती आपल्यासाठी फारच उपयोगी आहे. तसेच आयुर्वेदात देखील तुळशीचे बहुगुणी उपयोग असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तुळस ही आपल्या घरी असणं केव्हाही चांगलंच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये तुळस कुठे ठेवावी, यालाही काही शास्त्र (Shastra) आहे. घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो, याला महत्त्व आहे. तुळशीचे रोप योग्य दिशेने ठेवल्यास घरात नेहमी सुख-समृद्धी राहते, असे म्हटले जाते. तुळशीचे रोप लावण्याची दिशा महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे ती योग्य दिवशी लावण्याचा सल्लाही दिला जातो. तुळस ठेवण्याची दिशा आणि जागेला शास्त्रात महत्त्व असून, चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळे तुळस ठेवण्याची योग्य जागा आणि दिशा (Direction) कोणती आहे, हे आज आपण जाणून घेऊयात.

(हे ही वाचा : Vastu Tips Calendar: घरात ‘या’ दिशेला कॅलेंडर लावल्याने लक्ष्मी येते दारी? शास्त्रात काय सांगितलंय पहा जरा)

तुळशीचे रोप दारात लावावे की नाही? (Can We Keep Tulsi Plant In Front Of Main Door)

तुळशीचं रोप घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, असं म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार,, घराच्या छतावर तुळस ठेवू नये, असं म्हटलं जातं. घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान व्हायला लागतं. त्यामुळे तुळस योग्य ठिकाणी ठेवावी, असे सांगितले आहे. दारात तुळशीचे रोप लावणे वास्तूशास्त्रानुसार, शुभ मानले जात नाही. कारण, हे पूजनीय असून ते घराबाहेर ठेवल्याने आणि ये-जा करताना सर्वांची नजर त्यावर पडल्याने त्याचे शुभकार्य कमी होते, असे सांगितले आहे.

तुळशीचे रोप कुठे ठेवावे? (Best Direction To Keep tulsi At Home)

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. उत्तर दिशेला ठेवणे शक्य नसेल तर उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला लावू शकता. तसेच तुळशीचे रोप बाल्कनीत किंवा खिडकीजवळ उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवता येईल. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. तसेच गुरुवारी तुळशीचे रोप लावण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुळस लावल्याने भगवान श्री विष्णूची कृपाही प्राप्त होते. तसेच शनिवारी तुळशीचे रोप लावल्यास आर्थिक समस्या दूर होतात, असे मानले जाते.

(टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to vaastu shastra in which direction the tulsi plant is placed in the house pdb