आपल्यापैकी कित्येकांना घरामध्ये वेगवेगळी रोपं आणि झाडे लावण्याची हौस असते. मुंबईसारख्या शहरात घरामध्ये पुरेशी जागा नसल्यामुळे अनेकांना आपला हा छंद हवा तास जोपासता येत नाही. परंतु घरासमोर जर मोकळी जागा असेल, मोठं अंगण असेल तर हे लोक आवर्जून आपली बाग फुलवतात. घरामध्ये झाडं-झुडूपं लावायचे अनेक फायदे आहेत. वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये तुळस, कमळ यासारखी रोपं असली तर हवेची गुणवत्ता चांगली राहते. सोबतच त्या घरात वास्तुदोष आढळत नाही. परंतु वास्तुशास्त्रात अशा काही झाडांबद्दल सांगण्यात आलंय जी घरात असणे अशुभ मानले जाते. जाणून घेऊया या वनस्पती कोणत्या आहेत.
बाभूळ:
घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला बाभळीचे झाड नसावे. वास्तुशास्त्रात याला अशुभ मानले गेले आहे. असे मानले जाते की ही वनस्पती ज्या घरात असते, त्या घरातील सदस्यांचे एकमेकांशी पटत नाही. तिथे सतत वादविवाद होत राहतात.
Holi 2022 : जाणून घ्या, या होळीला तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणता रंग ठरणार भाग्यवान
कापूस :
वास्तुशास्त्रानुसार, चुकूनही आपल्या घरामध्ये कापसाचे झाड लावू नये. ही वनस्पती घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार करते. यामुळे जीवनात दुर्भाग्य आणि गरिबी येते.
मेहंदीचे रोप :
वास्तुशास्त्रानुसार मेहंदीचे रोप घरात लावू नये. असे मानले जाते की या वनस्पतीमध्ये वाईट आत्मे राहतात. तसेच ही वनस्पती जिथे असते तिथे त्याच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा पसरते. अशा परिस्थितीत हे रोप कधीही घरामध्ये किंवा घराजवळ लावू नये.
चिंचेचे झाड :
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये चिंच लावू नये. या वनस्पतीमध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते. याशिवाय चिंचेचे झाड असलेल्या जमिनीवर घर बांधणे टाळावे.
‘या’ स्वप्नांचा शनि देवासोबत आहे थेट संबंध; जाणून घ्या त्यांचे शुभ-अशुभ परिणाम
सुकलेली रोपे :
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कधीही कोरडी झाडे ठेवू नयेत. घरामध्ये कुंडीतील रोप सुकले तर ते ताबडतोब काढून टाकावे, कारण अशी झाडे नकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात. त्यामुळे जीवनात दुःख, संकटे येत राहतात.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)