Never Do These Things in Front of Your Wife and Children: आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान होते, ज्यांचे धोरण आजही माणसाला त्याचे जीवन जगण्यासाठी योग्य दिशा दाखवते. एक रणनीतीकार व महान अर्थशास्त्रज्ञ, बुद्धिमत्तेने समृद्ध असे आचार्य चाणक्य त्यांच्या धोरणांसाठी आजही खूप प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य यांना समाजाची सखोल जाण होती आणि त्याद्वारे त्यांनी एक धोरण तयार केले, ज्यामध्ये त्यांनी लोकांना आनंदी, यशस्वी व प्रतिष्ठित जीवन कसे जगावे हे सांगितले आहे. चाणक्यांची धोरणे आजच्या काळातही प्रासंगिक मानली जातात. असे मानले जाते की, जी व्यक्ती त्यांच्या धोरणांचे पालन करते, त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही अपयशाला सामोरे जावे लागत नाही.
वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. असे मानले जाते की, या तत्त्वांचे पालन केल्यास जीवनात नक्कीच यश मिळते. चाणक्यजींनी त्यांच्या नीतिशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीने आपली मुले आणि पत्नीसमोर कधीही बोलून दाखवू नयेत. त्यांनी अशा कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या बायको आणि मुलांसमोर बोलू नयेत, ते आपण जाणून घेऊ…
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्याविरुद्ध चुकीचा व अपशब्द बोलल्याचा त्याला सर्वांत जास्त त्रास होतो. त्यामुळे पत्नी आणि मुलांसमोर शब्दांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी. कारण- तुम्ही तुमच्या मुलांसमोर जसे वागाल, तसेच ते तुमच्यासमोर वागतील.
आचार्य चाणक्य यांच्या मते, आपण जे काही बोलतो किंवा कोणतीही क्रिया करतो, मग मुलेदेखील तेच करू लागतात. म्हणूनच आपण मुलांसमोर अयोग्य भाषा वापरू नये आणि पत्नीला उद्देशून कधीही अपशब्द वापरू नये. कारण- पत्नीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे तिच्या अपशब्द वापरल्याने माता लक्ष्मी नाराज होते.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, मुलांसमोर किंवा पत्नीसमोर अशा गोष्टी कधीही करू नका, ज्यामुळे त्यांना त्रास होईल. कारण- टोचून बोलल्याने आणि एखादे तेच वाक्य धरून बसल्याने मुलांचा व पत्नीचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे घरात भांडणे होत राहतात. त्यामुळे तुमचे नाते तणावमुक्त ठेवण्यासाठी पत्नीशी नेहमी प्रेमाने बोला.
चाणक्य मानतात की, जर तुम्हाला तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचे असेल, तर तुम्ही स्वतः शिस्त पाळली पाहिजे. तरच तुमची पत्नी आणि मुले शिस्त पाळतील. तसेच, कुटुंबाशी बोलताना रागापासून दूर राहत नम्रतेने बोलले पाहिजे. त्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.
(Disclaimer– या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)