Adhik Maas Amavasya 2023: तब्ब्ल १९ वर्षानंतर आज अधिक अमावास्येला अद्भुत महायोग जुळून आला आहे. मलमास म्हणजेच अधिकमासाच्या समाप्तीलाच श्रावण मासाचा आरंभ होत आहे. हिंदू पंचांगाच्या माहितीनुसार १५ ऑगस्ट, मंगळवारी दुपारी १२ वाजून ४२ मिनिटांपासूनच अमावस्या तिथी सुरु होत आहे. तर १६ ऑगस्ट दुपारी ३ वाजून ७ मिनिटांपर्यंत अमावस्या तिथी कायम असणार आहे. १६ ऑगस्ट पासूनच श्रावण सुद्धा सुरु होत आहे. हे दोन्ही मुहूर्त एकाच दिवशी जुळून येणे हा अत्यंत शुभ योग मानला जात आहे. त्यामुळेच आजच्या दिवसापासून सर्वच राशींच्या भविष्यात काही ना काही बदल दिसून येऊ शकतात. पण चार अशा राशी आहेत ज्यांचे नशीब या येत्या काळात चमकणार आहे, चला तर या नशीबवान राशींविषयी जाणून घेऊया ..

अधिक अमावस्येपासून ‘या’ चार राशींचे नशीब बदलणार?

तूळ रास (Libra Zodiac Horoscope)

अधिकमास अमावस्या तूळ राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. अधिक मासाच्या अमावास्येच्या मुहूर्तावर आपल्याला नोकरी- व्यवसायात मोठा धनलाभ होऊ शकतो. तुमच्या भाग्यात संतती सुखाची चिन्हे संपत्ती संबंधित विवाद सोडवले जाऊ शकतात. सरकारी व खाजगी दोन्ही क्षेत्रातील नोकरदारांना पदोन्नतीचे योग आहेत. लग्नासाठी इच्छुक असणाऱ्यांना विवाहयोग्य स्थळ चालून येऊ शकते. नवीन एखादा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असल्यास काही पावले पुढे जाऊ शकता.

Mahashtami Grah Gochar
बक्कळ पैसा! ५० वर्षानंतर महाअष्टमीला निर्माण होणार दुर्लभ संयोग; तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
Shani And Rahu Nakshatra Parivartan
५० वर्षानंतर राहु आणि शनि एकत्र, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब , मिळू शकतो बक्कळ पैसा
Territorial Battles Lead to t9 Tiger Deaths in Nagzira Reserve
विश्लेषण : वर्चस्वाची लढाई नागझिऱ्यातील वाघांसाठी धोकादायक?
Loksatta vyaktivedh Street artist Hanif Qureshi passed away
व्यक्तिवेध: हनीफ कुरेशी
new comet Tsuchinshan Atlas will come close to Earth
उत्सवाच्या काळात आकाशात काय घडणार? हजारो वर्षानंतर दुर्लभ…
After 75 years of independence ST bus started for the first time in Naxal-affected Gardewada
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनतर नक्षलग्रस्त गर्देवाडात ‘लालपरी’ अवतरली; गावात पहिल्यांदाच…
Budh Gochar 2024 in marathi
बुधाचे १२ महिन्यांनंतर वृश्चिक राशीत संक्रमण! मकरसह ‘या’ दोन राशींवर पडेल पैशांचा पाऊस; नोकरी, व्यवसायातील अडचणी होतील दूर

कुंभ रास (Aquarius Zodiac Horoscope)

कुंभ राशीला अधिकमास अमावस्या अनुकूल सिद्ध होऊ शकते. नोकरी व धनप्राप्तीचे योग आहेत. प्रॉपर्टी खरेदी करण्याची नामी संधी चालून येऊ शकते. आत्मविश्वासात वाढ होईल. आई – वडिलांच्या मदतीने एखादी नवी सुरुवात करू शकतात. व्यावसायिकांना नवे संपर्क जोडण्याची संधी मिळेल, हे नव्याने जोडलेले लोक तुम्हाला आयुष्यभरासाठी मौल्यवान साथ देऊ शकतात. आर्थिक प्रगतीसाठी गुंतवणुकीवर भर द्या.

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

अधिकमास अमावास्येला वृषभ राशीसाठी गोड बातम्या घेऊन येऊ शकतात. चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते. नोकरी किंवा कामाच्या निमित्ताने वास्तव्याचे स्थान बदलू शकते. समाजात मान- सन्मान वाढू शकतो. तुमच्या जुन्या आजारांपासून सुटका मिळू शकते. भविष्यात आर्थिक लाभाचे काही संकेत आहेत ज्याचे कारण तुमचे जोडीदार ठरू शकतात. कामाची नवी जबाबदारी मिळू शकते.

हे ही वाचा<< रक्षाबंधनाला ‘या’ ४ राशींची भावंडं होतील मालामाल; भावा- बहिणीच्या नात्यात येईल पेढा-बर्फीचा गोडवा

कन्या रास (Virgo Zodiac Horoscope)

कन्या राशीला सकारात्मक वातावरण अनुभवता येऊ शकते. व्यापारी वर्गासाठी उत्तम काळ आहे, व्यवसायात मोठा धनलाभ होऊ शकतो. धनवृद्धी झाल्याने बाजूला सारलेली स्वप्न आपण पूर्ण करू शकणार आहात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. वैवाहिक आयुष्यातील कलह संपुष्टात येऊ शकतात. नातेसंबंधावर विश्वास वाढू शकेल अशी एखादी घटना घडण्याची चिन्हे आहेत.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)