Weekly Horoscope Marathi 7to 13th August 2023: अधिक श्रावणातील शेवटचा आठवडा हा ज्योतिषशास्त्रानुसार विशेष असणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच कालाष्टमी व्रत तर शेवटाकडे वळताना एकादशी व प्रदोष व्रत असे दोन योग जुळून आले आहेत. पंचांगानुसार उद्या म्हणजेच ८ ऑगस्टला कालाष्टमी असणार आहे तर १२ ऑगस्टला या महिन्यातील कमला एकादशी असणार आहे. १३ ऑगस्ट म्हणजेच रविवारी रवी प्रदोष व्रत असणार आहे. याशिवाय या आठवड्याभरात मुख्य ग्रहांच्या काही महत्त्वाच्या हालचाली सुद्धा होणार आहेत. जसे की, ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, आज म्हणजेच ७ ऑगस्टला शुक्र देव कर्क राशीत प्रवेश घेणार आहेत. यामुळे गजलक्ष्मी राजयोग सुद्धा तयार झाला आहे. या आठवड्याभरात नेमक्या कोणत्या राशीच्या भाग्यात प्रगतीचा व धनप्राप्तीचा योग आहे तर कुणाला कष्ट सोसावे लागणार आहेत याचा आढावा घेऊया..

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

मेष राशीसाठी हा आठवडा आर्थिक प्रगतीचा असणार आहे. पैशाच्या संबंधित अनेक त्रास दूर होणार आहेत. आपल्याला एखाद्या अनपेक्षित व अनोळखी व्यक्तीची मदत होऊ शकते पण यामुळे कोणावरही अंध विश्वास ठेवू नका. आरोग्यरूपी समृद्धी सुद्धा आपल्याला लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना अधिक काम करावे लागू शकते. वैवाहिक जीवनात शांती अनुभवायला मिळू शकते.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कौतुक करून घेण्याची संधी घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाला व मेहनतीचा योग्य असे गोड फळ मिळू शकते. परिवारासह प्रवासाची संधी मिळणार आहे. आपल्या मानसिक शांततेकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्वतःसाठी वेळ काढायला हवा. पगाराच्या संबंधित तक्रारी दूर होतील.

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

शुक्राचा प्रभाव आपल्या राशीच्या धन स्थानी तयार होत आहे. तुम्हाला बचतीची व त्याहूनही अधिक गुंतवणुकीची संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यामुळे अनेक वाद, कौटुंबिक कलह दूर सारता येतील. तुमच्या बोलण्या- चालण्याच्या पद्धतीत सुधारणा दिसून येऊ शकते. यामुळे तुमच्याकडे लोकांचे लक्ष वेधले जाईल. जे लोक संवाद- संभाषण संबंधित क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा फायदा ठरू शकतो.

कर्क रास (Cancer Zodiac Horoscope)

कर्क राशीच्या मंडळींची अडकून पडलेली कामे पूर्णत्वास जाऊ शकतात. आर्थिक चणचण दूर होऊ शकते. घरातील वयस्कर व्यक्तींची काळजी घ्यावी लागू शकते. काहीसा संमिश्र असा हा आठवडा असणार आहे आपली धावपळ होण्याची चिन्हे आहेत. पण आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चिंतामुक्त करणारी एखादी घटना घडू शकते.

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

सिंह राशीला आपल्या भविष्याची तरतूद म्हणून गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते. स्वतःच्या निर्णय क्षमतेवर काम करावे लागेल. आत्मविश्वास तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो. तुम्हाला या काळात एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीची भेट घेता येऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या अपेक्षा या काही प्रमाणात पूर्ण होऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी अचानक हुरहूर वाढू शकते, मानसिक शांती प्राप्त करण्यावर लक्ष द्या.

कन्या रास (Virgo Zodiac Horoscope)

गजलक्ष्मी राजयोग आपल्या राशीच्या मिळकतीवर प्रभाव टाकणाऱ्या स्थानी तयार होत आहे. तुम्हाला करिअरमध्येही प्रगती करता येऊ शकते तसेच त्यातून प्रचंड कमाईची सुद्धा संधी आहे. याशिवाय तुम्हाला वैवाहिक सौख्य लाभण्याची चिन्हे आहेत. जर तुम्ही संततीप्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर येणारा महिन्याभराचा कालावधी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन येऊ शकतो.

तूळ रास (Libra Zodiac Horoscope)

एखादे मोठे काम पूर्ण करण्यासाठी हा आठवडा फायदेशीर ठरू शकतो. आठवड्याच्या शेवटी सर्व ताण – तणाव विसरून आपण काही आठवड्यात पहिल्यांदाच रिलॅक्स होऊ शकतात. कौटुंबिक सुखाचा अनुभव घेता येईल. या आठवड्यात प्रवास टाळणे उचित ठरेल.आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. विशेषतः सर्दी-खोकला, ताप यांचे त्रास डोकं वर काढू शकतात.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)

सध्या चंद्र ग्रहाची साथ उत्तम आहे. चांगली आहे असे म्हणता येणार नाही. समोरच्याने आपले ऐकलेच पाहिजे हे ब्रीदवाक्य खोडून टाका. सध्या ती परिस्थिती नाही. कोणताही साम-दंड-भेद वापरून जरी तुम्ही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. वातावरण शांत असताना गढूळ पाण्यात काठी मारू नका. इतरांच्यात हस्तक्षेप करणे टाळा. मुलांच्या बाबतीत हलगर्जीपणा टाळा. जोडीदाराचे मत ऐकून घ्या. त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. मानसिक शांतता राखा. शारीरिकदृष्टय़ा योगसाधनेला महत्त्व द्या.

धनु रास (Sagittarius Zodiac Horoscope)

सप्ताहात हा दिवस चांगला, तो दिवस वाईट असेच वातावरण तुम्ही अनुभवता. सध्या मात्र सर्व दिवस अनुकूल वातावरणाचे असतील. चांगले दिवस असताना हातावर हात ठेवून बसणे म्हणजे चांगली संधी डावलल्यासारखे आहे, तेव्हा शांत बसू नका. कामकाजाचे वेळापत्रक ठरवा. त्यानुसार वाटचाल सुरू करा. चांगली वेळ आहे तोपर्यंत स्वस्थ बसू नका. स्वत:च्या जबाबदारीवर घेतलेले निर्णय योग्य राहतील. इतरांचा विचार करण्याची गरज भासणार नाही. व्यावसायिकदृष्टय़ा अपेक्षित नफा मिळेल.नोकरदार वर्गाला नवीन कामाचा अनुभव चांगला राहील. आर्थिक लाभ होईल.

मकर रास (Capricorn Zodiac Horoscope)

कोणावर अवलंबून राहून काम न केल्यामुळे कामे हातासरशी होतील. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हेसुद्धा चांगल्या ग्रहमानाचे संकेत असतात. कोणताही निर्णय घेताना द्विधावस्था होणार नाही. धाडसी वृत्ती राहील. व्यावसायिकदृष्टय़ा नफा चांगला मिळेल.नोकरदार वर्गाला अधिकार मिळेल. आर्थिक बाबतीत चढ-उतार राहणार नाही. समतोल स्थिती राहील. घरामध्ये कोणत्याही गोष्टींवर चर्चा करताना एकमत होईल. आरोग्य ठणठणीत राहील.

कुंभ रास (Aquarius Zodiac Horoscope)

चांगल्या गोष्टींचा शुभारंभ होईल. कामे अगदी वेळेत होऊ लागतील. ज्या गोष्टींसाठी पर्यायी मार्ग मिळत नव्हता अशा गोष्टींना पर्यायी मार्ग मिळेल. व्यवसायासाठी केलेले श्रम सार्थकी लागतील. उद्योगधंद्यांना चालना मिळेल. नोकरदार वर्गाचे कामाचे स्वरूप बदलेल. आर्थिक मोबदला चांगला मिळेल. संततीसौख्य लाभेल. नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. हातून पुण्यकर्म घडेल. आरोग्य उत्तम राहील.

हे ही वाचा<< प्रेमात अतिहळवी व स्वभाव अतिलहरी; तुमचा भाग्यांक हाच आहे का? जन्मतारखेवरून जाणून घेऊ स्वभाव

मीन रास (Pisces Zodiac Horoscope)

आठवड्याची सुरुवात कंटाळवाणी होऊ शकते पण या व्यतिरिक्त सर्व दिवस उत्साही ठरू शकतात. व्यवसायात जी स्थिती आहे ती चांगलीच आहे. त्यात स्वत:हून काही बदल करू नका. नोकरदार वर्गाला कामामध्ये होणारा ताणतणाव कमी होईल. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील.सामूहिक गोष्टीत सहभाग टाळा. भावंडांशी संवाद साधाल. शेजाऱ्यांविषयी आपुलकी वाटेल. कुटुंबात सर्वासोबत धार्मिक स्थळांना भेट द्याल. मनोरंजन होईल. मानसिक समाधान लाभेल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader