Laxmi Narayan Yog: आजपासून अधिक श्रावण मासारंभ झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या अधिक श्रावण महिन्यात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासक सांगतात की, प्रत्येक ग्रह हा वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात, ग्रहांच्या युतीने काहीवेळा शुभ- अशुभ राजयोग तयार होत असतात. त्यातही लक्ष्मी नारायण राजयोग हा अत्यंत शुभ मानला जातो. धन व सुख या दोन्हीच्या वृद्धीसाठी हा राजयोग परिणामकारी ठरू शकतो. येत्या २५ जुलैला शुक्र व बुध ग्रह सिंह राशीत एकत्र येऊन लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. ७ ऑगस्टपर्यंत हा राजयोग सक्रिय राहणार आहे. ७ ऑगस्टनंतर शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार असल्याने त्यानंतर युती वेगळी होईल. तत्पूर्वी लक्ष्मी नारायण राजयोगाच्या १२ दिवसांमध्ये ३ राशींना अपार धनलाभ होऊ शकतो. या राशी कोणत्या हे पाहूया..
लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ३ राशींचे अच्छे दिन
तूळ रास (Libra Zodiac Horoscope)
लक्ष्मी नारायण योग तूळ राशीच्या मंडळींना एक वरदान सिद्ध होऊ शकतो. या काळात तुमचे नशीब तुम्हाला साथ देऊ शकते, व्यवसायात सुद्धा मोठा लाभ होऊ शकतो. नोकरदार मंडळींना आयुष्यभर कामी येतील असे काही संपर्क वाढवता येऊ शकतात. तुम्हाला तुम्ही आता करत असलेलं काम बदलून एखादी करिअरची वेगळीच वाट धुंडाळता येऊ शकते. लक्ष्मी नारायण राजयोगाने तुम्ही सुरु केलेल्या प्रत्येक कामात यश आणि परिणामी प्रचंड धनलाभ होऊ शकतो.
मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)
लक्ष्मी नारायण राजयोग मिथुन राशीसाठी सुद्धा शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्हाला जोडीदाराच्या रूपातून मोठा लाभ होऊ शकतो. तुम्हाला प्रेमाची नव्याने ओळख होऊ शकते. जुन्या कर्जाचे ओझे डोक्यावरून उतरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक झाल्याने मन प्रसन्न राहू शकते.
हे ही वाचा<<पुढील दोन आठवड्यात ‘या’ तारखांना जोरदार पावसाचा अंदाज! मुंबईसह राज्यातील पावसाचे रूप कसे असेल?
कन्या रास (Virgo Zodiac Horoscope)
कन्या राशीसाठी सुद्धा लक्ष्मी नारायण राजयोग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. तुमच्या आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. नशिबाची तगडी साथ लाभल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय निर्धास्त होऊन घेऊ शकाल. वादातून मुक्ती मिळेल. धनलाभ व धन संचयासह गुंतवणुकीवर सुद्धा भर देण्याचा प्रयत्न करा.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे,लोकसत्ता याची पुष्टी करत नाही)