Till Tulsi Vivah These Rashi To Earn Money: दिवाळीच्या शुभ दिनी म्हणजेच दोन दिवसांपूर्वी १२ नोव्हेंबरला चार अत्यंत दुर्मिळ व शुभ राजयोगांसह लक्ष्मीपूजन मुहूर्त पार पडला. आज दिवाळीचा पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा साजरी केली जात आहे. दिवाळीच्या दिवसातील ग्रहमान बघता माता लक्ष्मी व गणरायाचा आशीर्वाद मिळवून देणारे चारही राजयोग तुळशीच्या लग्नापर्यंत कायम असणार आहेत. महालक्ष्मी राजयोग, आयुष्यमान राजयोग, सौभाग्य योग व सर्वात महत्त्वाचा असा आदित्य मंगल राजयोग या काळात काही राशींच्या कुंडलीत सोन्याहून पिवळा सुखाचा कालावधी घेऊन येणार आहे. या काळात तुम्हाला बुद्धीदाता गणेशाची व लक्ष्मी मातेची कृपा अनुभवता येऊ शकते. या नशीबवान राशींचं यादीत तुमची रास सुद्धा समाविष्ट आहे का हे पाहूया..

तुळशीच्या लग्नापर्यंत चार राजयोग कायम! तुमच्या राशीला होणार का धनलाभ?

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

कर्क राशीला आदित्य मंगळ राजयोग अधिक लाभ देणारी आर्थिक स्थिती तयार करू शकतो. या काळात तुम्हाला हितशत्रूंना मात देता येईल. तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धी होण्याची सुद्धा चिन्हे आहेत. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणाहून धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्रोत वाढल्याने तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. घरी पाहुण्यांचे आगमन होईल, वातावरण खेळीमेळीचे असल्याने तुम्हाला मानसिक शांती व समाधान अनुभवता येऊ शकते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

कन्या राशीच्या मंडळींसाठी दिवाळी व नंतरचा कालावधी अत्यंत लाभदायक असू शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढल्याने अनेक लांबणीवर पडलेली कामे मार्गी लागू शकतात परिणामी तुम्हाला होणारा आर्थिक फायदा सुद्धा वाढू शकतो. दिवाळीत तुमचे आयुष्य दिवाळीच्या दिव्यांप्रमाणे उजळून निघेल व यामध्ये तुमच्या कुटुंबाचे योगदान सर्वाधिक असेल. तुमची जुनी भांडणे व वाद निवळू शकतात, जुन्या मित्र- मैत्रिणीशी गाठ भेट होऊ शकते.

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

वृश्चिक राशीच्या कुंडलीत स्वतः लक्ष्मीमाता व धनदेवता विराजमान आहे. या कालावधीत व्यावसायिकांना विशेष लाभ होऊ शकतो. समाजातील तुमचा मान- सन्मान वाढू शकतो. तुम्हाला अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतात. कर्जातून मुक्त होण्याची संधी मिळू शकते. आरोग्यात सुद्धा सुधारणा होईल ज्यामुळे तुमचा येत्या दिवसांमधील उत्साह व ऊर्जा वाढलेली असू शकते. आई वडिलांच्या रूपात तुम्हाला आशीर्वाद मिळू शकते. या कालावधीत मनात सेवाभाव कायम ठेवावा.

हे ही वाचा<< ७०० वर्षांनी दिवाळीला ५ राजयोग बनल्याने धनलक्ष्मी ‘या’ राशींच्या नशिबाला देईल कलाटणी; तुमची रास यात आहे का?

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीच्या मंडळींच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घेऊन येण्याचे काम हे राजयोग करणार आहेत. तुम्हाला अध्यात्माची गोडी जाणवेल. संततीप्राप्तीसाठी येणारा कालावधी गोड बातमी घेऊन येणारा असू शकते. शेजाऱ्यांशी नाती सुधारतील. तुम्हाला वरिष्ठांची साथ लाभल्याने कामाच्या ठिकाणी तुम्हाला न बोलता काही कामे मार्गी लावता येतील. कलाविश्वातील मंडळींना मोठ्या संधी मिळू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)