Ganesh Chaturthi Rashifal : भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाची प्रतिष्ठापना केली जाणार असून १० दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या वर्षी गणपती बाप्पा ३ राशीच्या लोकांसाठी आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Rashifal 7 September 2024 : यंदा गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर २०२४ रोजी असून या दिवसापासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. गणेशोत्सव १० दिवस चालतो आणि १७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाने त्याची सांगता होईल.

१०० वर्षांनतर दुर्मिळ योग

यंदा भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी खूप खास आहे कारण १०० वर्षांनंतर गणेश चतुर्थीला दुर्मिळ योगायोग घडत आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्मयोग आणि इंद्र योग यांचा संयोग होत आहे. तसेच स्वाती आणि चित्रा नक्षत्रामुळे काही राशींना फायदा होईल.

गणेश पूजनासाठी अत्यंत शुभ मुहूर्त

अशाप्रकारे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश स्थापना आणि उपासनेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त असेल. तसेच ३ राशीच्या लोकांसाठी ग्रह आणि नक्षत्रांची ही स्थिती खूप शुभ असणार आहे. या लोकांना एवढा आनंद आणि समृद्धी मिळेल की, गणेशोत्सवाबरोबरच या लोकांच्या आयुष्यातही सणांचा काळ सुरू होईल, असे म्हणता येईल.

हेही वाचा – Rishi Panchami 2024: ‘ही’ एक गोष्ट न केल्यास ऋषीपंचमीचे व्रत मानले जाते अपूर्ण; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी

वृषभ (TAURUS)

वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थी खूप शुभ परिणाम देईल. एक एक करून तुमची सर्व कामे पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला मोठा फायदा होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. संपत्ती वाढेल. जीवनात आनंद मिळेल.

हेही वाचा –शनी देव करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश! ‘या’ राशींचे नशीब चमकणार; नवीन नोकरीसह मिळणार अपार धनलाभ

कर्क राशी ( Cancer )

गणेश उत्सव कर्क राशीच्या लोकांच्या जीवनातील उत्सवाची सुरुवात देखील करेल. या लोकांना अमाप संपत्ती मिळेल. तुमचे काम खूप चांगले होईल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल.

हेही वाचा –Shukra Nakshatra Gochar : शुक्र करणार या नक्षत्रात गोचर, १३ सप्टेंबरपर्यंत ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार धनलाभ

कन्या राशी (Virgo)

कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात गणेशोत्सव भरपूर संपत्ती आणि समृद्धी घेऊन येईल. तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. आतापर्यंतच्या करिअरमध्ये ज्या समस्या होत्या त्या दूर होतील. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळतील.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 100 years ganesha chaturthi will create wonderful yoga with bappas grace these people can become millionaires happy days will come snk